Tomato market : टोमॅटो दरात मोठी घसरण

Anil Jadhao 

मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी आडचणीत आले आहेत.

राज्यातील बाजारात टोमॅटो दरातील घट कायम आहे. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल ३०० ते ८०० रुपये दर मिळतोय.

टोमॅटोचे दर कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. या दरातून टोमॅटो वाहतुकीचा खर्चही वसूल होत नसल्याचं शेतकरी सांगत आहेत.

सध्या बाजारातील टोमॅटो आवक जास्त असल्यानं दर पडले आहेत. टोमॅटो आवक महत्वाच्या बाजारांमध्ये सरासरीपेक्षा जास्त आहे.

मागील काही महिन्यांमध्ये टोमॅटोला चांगला दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवडी वाढवल्या. आता या लागवडी तोडणीला आल्या आहेत.

पुढील काही दिवस ही स्थिती राहू शकते, बाजारातील आवक मर्यादीत झाल्यानंतर दर सुधारु शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.