Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : यंदा खरिपासाठी अकोला जिल्ह्याचे पीककर्ज ३८ कोटींनी वाढवले

Kharif Season : आगामी खरीप हंगामासाठी प्रशासनाने जिल्ह्याच्या पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक गेल्या हंगामाच्या तुलनेत ३८ कोटी रुपयांनी वाढवून यंदा १२७५ कोटी रुपये एवढा केला आहे.

Team Agrowon

Akola News : आगामी खरीप हंगामासाठी प्रशासनाने जिल्ह्याच्या पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक गेल्या हंगामाच्या तुलनेत ३८ कोटी रुपयांनी वाढवून यंदा १२७५ कोटी रुपये एवढा केला आहे. मागील हंगामात १२३७ कोटी रुपयांचे खरिपासाठी उद्दिष्ट देण्यात आले होते.

प्रशासनाने यावर्षी १२७५ कोटी रुपये वाटपाचे लक्ष्य घेतले असून, यापैकी सर्वाधिक ६०५ कोटी रुपये वाटपाचा लक्ष्यांक जिल्हा मध्यवर्ती बँकेला देण्यात आला आहे.

म्हणजेच एकूण नियोजित रकमेच्या जवळपास ५० टक्के रक्कम वितरणाची जबाबदारी जिल्हा बँकेवर सोपविण्यात आली आहे. बँकेने एप्रिलपासून पीककर्ज वाटपाला सुरुवात करीत आतापर्यंत सुमारे पावणे चारशे कोटी रुपये वाटप करीत आघाडी मिळवली.

पीककर्ज वाटपासाठी इतर बँकांमध्ये राष्ट्रीयीकृत बँकांना ४५१ कोटी, खासगी बँकांना ८८ कोटी, तर ग्रामीण बँकेला १३० कोटी रुपये वाटपाचे लक्ष्य देण्यात आले आहे.

गेल्या हंगामाप्रमाणेच जिल्हा बँकेचा लक्ष्यांक कायम ठेवण्यात आला. राष्ट्रीयीकृत बँकांना गेल्या वर्षाच्या ४४५ कोटी रुपयांवरून यंदा ४५१, तर खासगी बँकांना ६६ वरून ८८ कोटी, तर ग्रामीण बँकेला १२० कोटींवरून १३० कोटींचा लक्ष्यांक दिला आहे.

जिल्ह्यात खरिपासाठी ४७२ कोटी रुपयांचे वाटप केले गेले. यात जिल्हा बँकेने ३७६ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांनी ४१ कोटी, खासगी बँका ३ कोटी ४८ लाख, तर ग्रामीण बँकेने ५१ कोटींचे वितरण केले.

पीककर्ज मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे जुळवताना शेतकऱ्यांची पळापळ सुरू आहे. सीबिलचा मुद्दा कर्ज वाटपात अडथळा बनलेला होता. शासनाने याबाबत स्पष्टता केल्याने येत्या काळात या मुद्द्याशिवाय पीककर्ज सहजरित्या वाटपाला गती येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बँकनिहाय वाटपाचे उद्दिष्ट (कोटींमध्ये)

जिल्हा बँक ६०५

राष्ट्रीयीकृत बँक ४५१

खासगी बँक ८८

ग्रामीण बँक १३०

एकूण १२७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT