Grape  Agrowon
ताज्या बातम्या

Grape Theft : दिक्षीमध्ये पाऊण लाखांच्या काळ्या द्राक्षांची चोरी

सध्या बागेतील द्राक्षांच्या विक्रीचा सौदाही झाला होता. व्यापाऱ्याला ७० रुपये प्रतिकिलोने द्राक्ष विक्री करावयाची होती.

Team Agrowon

Grape Theft News : ओझर, ता. निफाड : दिक्षी (ता. निफाड) येथील जनार्दन स्वामी रस्त्यावरील बाळासाहेब चौधरी यांच्या गट नं. ९८ दिक्षी शिवारातील काळ्या पर्पल वाणाच्या द्राक्षावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. (Latest Agriculture News)

त्यात सुमारे पाऊण लाखांचे द्राक्ष चोरीला गेले आहेत. परिसरात मोठी टोळी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्री बागेत पहारा देण्याची वेळ आल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

बुधवारी (ता.२९) च्या मध्यरात्रीनंतर दिक्षी विकास संस्थेचे माजी सभापती बाळासाहेब चौधरी यांच्या विक्री सौदा झालेल्या द्राक्षाच्या सुमारे तेरा ओळींतील १५ ते १६ झाडांवरील एक्स्पोर्ट दर्जाचा सुमारे ४० ते ५० क्रेट माल चोरट्यांनी चोरून नेला.

सध्या बागेतील द्राक्षांच्या विक्रीचा सौदाही झाला होता. व्यापाऱ्याला ७० रुपये प्रतिकिलोने द्राक्ष विक्री करावयाची होती. चोरट्यांनी आधी त्यांच्या मळ्या शेजारीच राहणारे शेतकरी राजाराम चौधरी यांच्या गोदामामधून २५ कॅरेटची चोरी केली.

एका ठिकाणी कॅरेटची चोरी तर दुसऱ्या ठिकाणचे द्राक्ष चोरट्यांनी चोरून नेले. या बाबत चौधरी यांनी ओझर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अस्मानी व सुलतानी संकटामुळे बळीराजा कर्जबाजारी झाला आहे. त्यात आता हातातोंडाशी आलेल्या घासावरही चोरट्यांचा डोळा आहे. शेतकऱ्याने आता बांधावरही सीसीटीव्ही लावावे का, असा प्रश्न आहे.
- बाळासाहेब चौधरी, माजी सभापती, सोसायटी दिक्षी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Geo Tagging Inspection: पथकाकडून विमा संरक्षित बागांची पाहणी

Agricultural Pumps: कृषी पंपांना मिळेना अखंडित वीजपुरवठा

Illegal Sand Mining: अवैध वाळू उपशाविरोधात महसूल विभागाची कारवाई

Threshing Season: रायगड जिल्ह्यात ‘मळणी’चा उत्सव सुरू

Agriculture Bhavan: अमरावतीच्या कृषी भवनला हवा इच्छाशक्‍तीचा टेकू 

SCROLL FOR NEXT