Tomato Agrowon
ताज्या बातम्या

Tomato Market : शेतकऱ्यांचे पावणेदोन कोटी घेऊन टोमॅटो व्यापारी पसार

Tomato Market Fraud : शेतकऱ्यांकडून टोमॅटोची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने एक कोटी ८० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच घडला. हे टोमॅटो व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे न देता फरारी झाल्याने शेतकरी हलावदिल झाले आहेत

Team Agrowon

Nashik News : शेतकऱ्यांकडून टोमॅटोची खरेदी (Tomato Procurement) करणाऱ्या व्यापाऱ्याने एक कोटी ८० लाखांची फसवणूक (Fraud With Tomato Farmer) केल्याचा प्रकार नुकताच घडला. हे टोमॅटो व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे न देता फरारी झाल्याने शेतकरी हलावदिल झाले आहेत.

सोमवारी (ता. २७) शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांना निवेदन देत पैसे मिळून देण्याची मागणी केली. या व्यापाऱ्याविरोधात पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे.

पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डात जिल्ह्याभरातील विविध भागांतून टोमॅटो विक्रीसाठी येतो. टोमॅटो व्यापारी नौशाद फारुकी व शमशाद फारुकी यांनी सप्टेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२२ यादरम्यान शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी केले. मात्र त्याचे पैसे दिले नाहीत.

ज्या शेतकऱ्यांना त्यांनी धनादेश दिले, ते बाउन्स झाले. या व्यापाऱ्याकडून १७९ शेतकऱ्यांना सुमारे १ कोटी ८० लाख रुपये येणे बाकी आहे. व्यापारी पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते. ते सध्या फरार आहेत. व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्या गाळे व मालमत्तांचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

व्यापाऱ्याचा गाळा विकणार

नाशिक बाजार समिती प्रशासनास या प्रकरणी माहिती उपलब्ध झाली. व्यापाऱ्याने विकलेला गाळा ताब्यात घेतला. त्याची विक्रीप्रक्रिया सुरू केली आहे.

तसेच व्यापारी आपल्या खासगी मिळकती विकत असल्याबाबत बाजार समितीस माहिती मिळताच दस्त नोंदणी कार्यालयात पत्रव्यवहार करीत माहिती मागविली आहे.

याबाबत माहिती उपलब्ध करून बाजार समिती कायद्यांतर्गत ‘५७ अ’ प्रमाणे कारवाई करणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.

खरेदी केलेल्या टोमॅटोचे पैसे व्यापाऱ्याने अजूनही दिलेले नाहीत. बाजार समिती प्रशासनाने आम्हा शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्यावेत.
- संजय काकड, शेतकरी, मखमलाबाद
बाजार समितीत आयटीसी ट्रेडिंग कंपनीत टोमॅटो दिला होता. पैसे मिळण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने पुढाकार घ्यावा.
- संतोष सानप, शेतकरी, सिन्नर
संबंधित व्यापाऱ्याला बाजार समिती प्रशासनाने नोटीस दिली आहे. मात्र व्यापाऱ्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदविली आहे.
- अरुण काळे, सचिव, नाशिक बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SMART Project: ‘स्मार्ट’ वचनात अडकले शेतकरी

Rabi Season: रब्बी हंगामात तीळ पेरणी अल्प होणार

Turmeric Farming: हळदीमध्ये अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर

Dairy Farming: दुग्ध व्यवसायातून महिलांचे सक्षमीकरण  ः डॉ. रवींद्र काळे

Manoj Jarange Patil Death Threat: जरागेंनी एवढा मोठा गौप्यस्फोट केलाय तर पोलिसांनी तातडीने चौकशी करावी- बावनकुळे

SCROLL FOR NEXT