Lumpy Skin Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy virus : गिरणा पट्ट्यात ‘लम्पी’ची समस्या वाढली

lumpy skin disease in Jalgaon : गिरणा पट्ट्यात लम्पी स्कीन आजाराची समस्या पशुधनात वाढली आहे. ७९ पशुधन मृत्युमुखी पडले आहे.

Team Agrowon

Chalisgaon News : गिरणा पट्ट्यात लम्पी स्कीन आजाराची समस्या पशुधनात वाढली आहे. ७९ पशुधन मृत्युमुखी पडले आहे. भडगाव, पाचोरा,  चाळीसगावसह परिसरात पशुधनपालकांत भीतीचे वातावरण आहे. चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, भडगाव, पाचोरा, धरणगाव व एरंडोल येथे ‘लम्पी’ची समस्या अधिकची आहे. या भागातील सर्व पशुधनाचे बाजार बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लम्पीची समस्या वाढताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी चाळीसगाव तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन प्रत्यक्ष गोठ्यात जात जनावरांची पाहणी केली. या वेळी त्यांनी पशुपालकांशी संवादही साधला. ते म्हणाले, की लम्पी या आजाराला अटकाव घालण्यासाठी प्रशासन आपल्या पातळीवर पूर्णपणे सज्ज असून, विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे.

गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यासह परिसरात लम्पी आजाराची लागण झालेली जनावरे आढळून आली आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत या भागात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्याबरोबरच विविध खबरदारीच्या उपाययोजना देखील केल्या जात आहेत.

श्री. अंकित यांनी चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा, मुंदखेडा, तळेगाव, तसेच शहरातील विविध भागांत भेट देऊन प्रत्यक्ष गोठ्यात जात जनावरांची पाहणी केली.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाहेद तडवी, पशुसंवर्धन विभागातील अधिकारीही या वेळी उपस्थित होते. लम्पीसदृश जनावरे आढळून आलेल्या गोठ्यांमध्ये नियमित फवारणी करावी. आजाराची लागण झालेल्या जनावरांचे विलीनीकरण करावे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे आजाराच्या संदर्भातील औषधांचा पुरेसा साठा असून, औषधांचा नियमित पुरवठा करावा. पशुवैद्यकांनी देखील नियमित भेटी द्याव्यात, अशा सूचना श्री. अंकित यांनी दिल्या. पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घेताना लम्पीची लक्षणे आढळून आल्यानंतर तत्काळ पशुवैद्यकांना कळवावे. साथ पूर्णपणे नियंत्रणात असून, पशुपालकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farming: शेतकरी : वर्णव्यवस्थेतला तळाचा घटक

Tomato Disease Management: टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण

Wine Industry: ‘वाइन’ भूमी: कॅलिफोर्नियातील नापा व्हॅली

Weekly Weather: राज्यात ईशान्य मॉन्सूनचे आगमन

Tribal Women Empowerment: आदिवासी महिला योजनेच्या माध्यमातून होणार सक्षम

SCROLL FOR NEXT