Crop Loan
Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : ‘शिसाका’ चा प्रश्‍न रेंगाळलेलाच

टीम ॲग्रोवन

धुळे : एकरकमी कर्जफेडीसारख्या पर्यायातून शिरपूर साखर कारखान्याच्या (Shirpur Sugar Mill) थकीत कर्जाबाबत मार्ग काढा, कारखाना भाडेतत्त्वावर देऊन तो पुन्हा सुरू करा, असे निर्देश तत्कालीन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasabh Patil) यांनी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (Dhule, Nandurbar District Central Cooperative Bank) दिले होते. परंतु यासंबंधी अद्यापही कार्यवाही झालेली नाही.

शिरपूर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देऊन तो सुरू करण्याच्या पर्यायासंदर्भात मंत्रालयात सहकार विभागातर्फे झालेल्या बैठकीत मंत्री पाटील यांनी बंद साखर कारखान्यांबाबत सकारात्मकता ठेवण्याचे आवाहन केले होते.

बँकेचे कारखान्यावर थकीत कर्ज आहे. ते २६ कोटी रुपये मुद्दल व त्यावरील आजवरचे थकीत व्याज असे एकूण १०४ कोटी रुपये एवढे आहे. कर्जाची मूळ रक्कम कमी असून, त्यावर अवाजवी व्याज आकारणी केल्याचा मुद्दा काही संचालकांनी उपस्थित केला होता.

बैठकीत सहभागी घटकांची बाजू ऐकल्यानंतर तत्कालीन मंत्री पाटील यांनी एकरकमी कर्जफेड (ओटीएस) सारखे पर्याय वापरण्याचे आवाहन केले. काही अडचण जाणवल्यास राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल, असे आश्‍वासनही दिले होते. शिरपूर साखर कारखाना बहुराज्यीय असल्यामुळे त्याबाबत केंद्रीय निबंधकांशी चर्चा करण्याची गरज आहे.

दरम्यान, राज्यात सत्तांतर घडले आहे. ‘शिसाका’ भाडेतत्त्वावर देऊन सुरू करण्यासाठी सकारात्मकता तयार करण्याची आवश्यकता आहे. कारण शिरपूर व लगत ऊस शेती अधिक आहे. या भागातील ऊस इतर कारखानदार घेतात. केंद्रीय निबंधकांकडे आधीच ठराव

शिरपूर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यात यावा, असा ठराव संचालक मंडळाने आधीच केंद्रीय निबंधकांकडे पाठवला आहे. त्यासाठी जिल्हा बँकेनेही सहकार्य केले आहे. ‘शिसाका’ सुरू व्हावा, यासाठी आमदार अमरिश पटेल नेहमीच सकारात्मक आहेत, अशी माहिती ‘शिसाका’चे अध्यक्ष माधवराव पाटील यांनी जारी केली होती.

‘शिसाका’ बंद असल्यामुळे तेथील सुरक्षा कर्मचारी, इतर कर्मचारी, न्यायालयीन प्रकरणे आदींचा सर्व खर्च आमदार अमरिश पटेल व संचालक मंडळ वैयक्तिकरीत्या करीत आहेत. शिसाका मल्टिस्टेट साखर कारखाना असल्यामुळे तो केंद्रीय निबंधकांच्या अखत्यारित येतो. ‘शिसाका’च्या अडचणी लक्षात घेता तो भाडेतत्त्वावर देऊन सुरू करावा, असा ठराव अध्यक्ष व संचालकांनी १९ सप्टेंबर २०२१ ला केंद्रीय निबंधकांकडे पाठवला आहे. यामुळे पुढे हा कारखाना सूरू होईल, अशी अपेक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT