Milk Agrowon
ताज्या बातम्या

Milk Subsidy : सरकारने दुधाला दोन रुपयांचे अर्थसाहाय्य द्यावे ; कात्रज डेअरीची मागणी

Subsidy for Dairy Farming : राज्य सरकारकडून दूध दराचा फरक न मिळाल्यास दूध संघाला प्रतिदिन साडेतीन लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने दुधाला दोन रुपयांचे अर्थसहाय्य द्यावे, अशी मागणी कात्रज डेअरीने केली आहे.

Team Agrowon

Katraj Dairy News : राज्य सरकारने गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करून ३४ रुपये दर केला आहे. सहकारी दूध संघांना शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने दुधाला दोन रुपयांचे अर्थसाहाय्य करून सहकारी दूध संघास पाठबळ देण्याची मागणी जिल्हा दूध उत्पादक संघाने (कात्रज डेअरी) केली आहे.

शासन निर्णयानुसार २१ जुलै २०२३ पासून दूध उत्पादकाला ३४ रुपये प्रतिलिटर दर देण्याचे आदेश झाले. त्याप्रमाणे कात्रज डेअरीने त्याची अंमलबजावणी केली. या निर्णयामुळे संघाला प्रतिदिन साडेतीन लाखांचा तोटा होत असून तो दुग्ध व्यवसाय विकास आयुक्तांना कळविण्यात येत आहे. त्यामुळे अर्थसाह्य न दिल्यास संघाला ३४ रुपये भाव देणे शक्य होणार नसून ते परवडणारे नाही.

संघाकडून दूध उत्पादकाला वर्षअखेर दूधदर फरक देण्यात येतो. संघ दूध उत्पादकाचा असल्यामुळे होणारा नफा हा उत्पादकाच्या हितासाठीच वापरला जातो. तरी दुधाचे दर ३४ रुपये प्रति लिटरचे बंधनकारक करू नये, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पशुसवंर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी केली आहे.

‘प्रतिदिन साडेतीन लाखांचे नुकसान’

निर्णयापूर्वी संघाचा खरेदी दर ३२ रुपये प्रतिलिटर होता. तो वाढल्याने पाऊच विक्रीमध्ये होणारे उत्पन्न २ रुपयांनी कमी झाले आहे. त्यामुळे संघाला प्रतिदिन ३ लाख ५० हजार व महिन्याला १ कोटीचे नुकसान सहन करावे लागत असून हा तोटा वाढत आहे.

संघाकडे सध्या १ लाख ७५ हजार लिटर इतके दूध संकलन होत आहे. त्यापैकी सुमारे एक लाख लिटर दूध पाऊच पॅकिंगमधील विक्री होत असून, १५ हजार लिटर दूध महानंद व मदर डेअरीस पाठविण्यात येते. शिल्लक ५५ ते ६० हजार लिटर दूध खासगी मोठ्या डेअऱ्यांना ठोकमध्ये सुट्या स्वरूपात विक्री करावे लागते. त्यासाठी पोहोच दूध देण्यास अतिरिक्त ३ रुपये खर्च येत असल्याने संघास आर्थिक नुकसान होत आहे. -
भगवान पासलकर, अध्यक्ष, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: कोकणात उन्हाचा चटका; राज्यात तापमानाचा पारा तिशीपार

Lok Sabha adjourned: विरोधकांची जोरदार घोषणाबाजी, अध्यक्षांचा निर्णय; लोकसभेचे कामकाज ९ फेब्रुवारीपर्यंत तहकूब

Summer Sesame Sowing: उन्हाळी तीळ पेरणीची लगबग सुरू

Punjabrao Deshmukh Hostel Allowence Scheme: गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा खर्चासाठी मदत; पाहूयात डॉ. पंजाबराव देशमुख योजनेची A ते Z सविस्तर माहिती

Water Scarcity: पाणीटंचाई कृती आराखड्यास मंजुरी

SCROLL FOR NEXT