Team Agrowon
महाराष्ट्रात गायीच्या दूध दरावरून गोंधळ सुरू आहे. अशातच राज्यातील दूध संघांनी गायीच्या खरेदी दूध दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागच्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने दुग्ध व्यवसाय विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय समितीची स्थापना केली.
या समितीकडून गायीच्या आणि म्हशीच्या दुधाला दिला जाणारा किमान दूध दर पूढच्या तीन महिन्यात घेण्याची जबाबदारी दिली आहे.
परंतु यावर तोडगा निघण्यापूर्वी गायीच्या खरेदी दरात कपात करण्यात आली आहे.
दूध पावडर, बटर, लोण्याचे दर कमी झाल्यामुळे आजपासून (ता. १) गाय दूध खरेदी दरात २ रुपयांची कपात करण्याचा निर्णय गोकुळ, वारणा, चितळे, भारत डेअरी, राजारामबापू, कोयना, हुतात्मा संघ, थोटे यांनी घेतला आहे.
गाय दूध दरामध्ये ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर २ रुपये कपात केली आहे. त्यामुळे गाय दूध खरेदी आता ३७ रुपयांवरून ३५ रुपये केली आहे.