Horticulture Scheme
Horticulture Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Horticulture Cultivation : राज्यात ‘मनरेगा’तून साठ हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) यंदा सलग तिसऱ्या वर्षी वर्षभरात ६० हजार हेक्टरवर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट केले आहे. गेल्या वर्षी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या १८ जिल्ह्यांसह उद्दिष्टाच्या सर्वाधिक २२३ टक्के लागवड पूर्ण करणाऱ्या गोंदिया जिल्ह्याचे विशेष कौतुक केले आहे.

राज्यात गेल्या काही वर्षांपासून फळबाग लागवडीला शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जात आहे. पाच हेक्टरच्या आतील व जॉब कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) मधून फळबाग लागवड केली जात आहे.

तर पाच हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या किंवा जॉब कार्ड नसलेल्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी राबविण्यात येत असलेली स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना कोरोनाच्या काळात बंद होती.

ती योजनाही गेल्या वर्षीपासून सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यात फळबाग लागवडीला वेग येताना दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्यात प्रतिवर्षी साठ हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते.

पहिल्या वर्षी (२०१९-२०) ३८ हजार हेक्टरवर दुसऱ्या वर्षी (२०२१-२२) ४२ हजार हेक्टर वर तर यावर्षी (२०२२-२३) ४० हजार हेक्टरपर्यंत फळबाग लागवड झाली. यंदा पुन्हा नव्याने साठ हजार हजार हेक्टरवर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी फळबाग लागवडीचा नवीन मापदंड वेळेत निश्चित न झाल्यामुळे पुरेशी लागवड होऊ शकली नाही. यंदा मात्र पावसाळ्या आधीच राज्यातील कृषी विभागाकडून नियोजन सुरू आहे.

राज्यात ९०५३ कृषी सहायक असून प्रती कृषी सहायकांना इतर क्षेत्र निश्चित करण्यात आलेले असून या वर्षाभरामध्ये मागील तीन वर्षांच्या तुलनेत अधिक फळबाग लागतो कृषी विभागाने नियोजन केले आहे. गेल्या वर्षी ज्या जिल्ह्याने उद्दिष्ट पूर्ण केले त्या जिल्ह्यात काही अंशी यंदा उद्दिष्ट वाढवण्यात आले आहे.

यंदा निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार रत्नागिरी, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक प्रत्येकी ४ चार हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड होणार आहे. हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड, बीड, कोल्हापूर या जिल्ह्यांत मात्र फळबाग लागवडीचे उद्दिष्ट अत्यंत कमी आहे.

अर्ज मागवणे, खड्डे खोदणे, लागवड व इतर सर्व बाबींचे नियोजनही निश्चित करण्यात आले आहे. कृषी विभागाने केलेले नियोजन पाहता यंदा विस्तार पेक्षा अधिक फळबाग लागवड होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जिल्हानिहाय यंदाचे उद्दिष्ट (हेक्टरमध्ये)

ठाणे : १५०० रायगड : २४०० रत्नागिरी : ४००० पालघर : २७०० सिंधुदुर्ग : ३४००, नाशिक : ४०००, धुळे: १०००, नंदुरबार : २५००, जळगाव : २५००, नगर : ३०००, पुणे : ३०००, सोलापूर : २७००, सातारा : १२००, सांगली : १६००, कोल्हापूर: ६००, जालना : १८००, औरंगाबाद : १०००, बीड : ५००, लातूर : १३००, उस्मानाबाद : ८००, नांदेड: ७००, परभणी : १५००, हिंगोली : ६००, बुलडाणा : १८००, अकोला : १८००, अमरावती : १०००, वाशीम : १०००, यवतमाळ : २२००, अमरावती : २२००, वर्धा : १०००, नागपूर : १५००, भंडारा : १०००, गोंदिया : १५००, चंद्रपूर : १५००, गडचिरोली : १०००.

गोंदियासह १८ जिल्ह्यांचे कौतुक

कृषी विभागाने गतवर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मधून गतवर्षी (२०२२-२३) ६० हजार हेक्टर वर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यातील चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.

त्यात निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा २२३ टक्के अधिक फळबाग लागवड पूर्ण केल्याने गोंदिया जिल्ह्यातील कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे शासनाने विशेष कौतुक केले आहे.

याशिवाय उद्दिष्टापेक्षा जास्ती लागवड करणाऱ्या ठाणे, पालघर, रायगड, पुणे, जालना, लातूर, परभणी, बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली,.चंद्रपूर आदी जिल्ह्यातील कामाबाबतही समाधान व्यक्त केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT