Team Agrowon
अर्ज कसा करायचा
शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait. gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे.
राबवण्यात येणाऱ्या या घटकात विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लाभ मिळेल.
अनुदान किती असणार?
फुले घटकांत कट फ्लॉवर्ससाठी अल्पभूधारक शेतकऱ्यास एक लाख प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ४० हजार प्रतिहेक्टर अनुदान, तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल २५ हजार प्रतिहेक्टर अनुदान दिले जाईल.
कंदवर्गीयासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यास एक लाख ५० हजार प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ६० हजार प्रतिहेक्टर अनुदान, तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल ३७ हजार ५०० प्रतिहेक्टर अनुदान देण्यात येईल.
सुटी फुलेसाठी अल्पभूधारक शेतकऱ्यास ४० हजार प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल १६ हजार प्रतिहेक्टर अनुदान, तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल १० हजार प्रतिहेक्टर अनुदान देण्यात येईल.
जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्यास ४० हजार प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत खर्चाच्या ५० टक्के व जास्तीत जास्त २० हजार रुपये प्रतिहेक्टर अनुदान देण्यात येते.