chana Crop  Agrowon
ताज्या बातम्या

Chana Crop : चार एकर हरभऱ्यावर शेतकऱ्याने फिरवला ट्रॅक्टर

आगामी काळात हरभऱ्याची काढणी करता लागणारा खर्च झेपणार नसल्याने तडकित यांनी चक्क आपल्या सहा पैकी चार एकर हरभरा पिकावर ट्रॅक्टर चढवून पीक नष्ट केले.

Team Agrowon

टाकरखेडा संभू, अमरावती : भातकुली तालुक्यातील लसणापूर येथील एका शेतकऱ्याने चार एकर हरभरा पिकावर (Gram Crop) ट्रॅक्टर (tractor) फिरविला आहे. मर रोगाचा (MarRog) प्रादुर्भाव झाल्याने या पिकाची उत्पादन क्षमता खालावली आहे. यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्याने हा निर्णय घेतला.

येथील रहिवासी असलेले शेतकरी सतीश प्रल्हादराव तडकित यांना सततच्या पावसामुळे खरिपाने दगा दिला. त्यामुळे रब्बीमध्ये त्यांनी आपल्या सहा एकर शेतामध्ये हरभऱ्याची लागवड केली होती.

या पिकावर त्यांच्या सर्व आशा पल्लवीत असताना अलीकडे मर रोगाचा प्रादुर्भाव हरभऱ्यावर वाढला. त्यामुळे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आले. तसेच उत्पादन क्षमता कमी झाली.

आगामी काळात हरभऱ्याची काढणी करता लागणारा खर्च झेपणार नसल्याने तडकित यांनी चक्क आपल्या सहा पैकी चार एकर हरभरा पिकावर ट्रॅक्टर चढवून पीक नष्ट केले. त्यामुळे कृषी विभागाने याची दखल घेऊन शेतकऱ्याला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT