Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : सात जिल्ह्यांत नुकसानीचे अंदाजित क्षेत्र ७७ हजार हेक्टरवर

प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार मराठवाड्यातील ९६ हजार ९३४ शेतकऱ्यांच्या ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचे अंदाजित क्षेत्र ७७ हजार ५७३.१८ हेक्टरवर पोहोचले आहे.

Team Agrowon

Crop Damage Update छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात वादळी पावसाने (Unseasonal Rain) रब्बी पिकांसह फळपिकांचे नुकसान (Rabi Crop Damage) शनिवारी (ता. १८) ही सुरूच ठेवले.

प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार मराठवाड्यातील ९६ हजार ९३४ शेतकऱ्यांच्या ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचे अंदाजित क्षेत्र ७७ हजार ५७३.१८ हेक्टरवर पोहोचले आहे.

मराठवाड्यातील विविध भागात १४ मार्चपासून वादळी पावसाचे आक्रमण सुरू आहे. विजांचा कडकडाट, वादळ व गारपीटसह पडणाऱ्या वादळी पावसाने काढणीला आलेल्या रब्बी पिकांसह फळ पिकांचे व उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान केले व करतो आहे.

प्रशासनाच्या १९ मार्च अखेरच्या प्राथमिक अंदाजानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्रात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९३१४ शेतकऱ्यांचे ७७६२.५० हेक्टरवरील पिकाचे नुकसान केले आहे.

याशिवाय जालना ११६३३ शेतकऱ्यांचे १९ हजार ५३ हेक्टर, नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा प्रकोप जास्त असून या जिल्ह्यातील १९८९९ शेतकऱ्यांचे २३ हजार ५५४ हेक्टर, परभणी मधील ४५०० शेतकऱ्यांचे २४०० हेक्टर, हिंगोलीतील १३२८६ शेतकऱ्यांचे ५६०४ हेक्टर, बीडमधील २१४५९ शेतकऱ्यांचे ११३६५ हेक्टर,

लातूरमधील १६८४२ शेतकऱ्यांचे ११७९४.८० हेक्टर क्षेत्राचा समावेश समावेश असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. नुकसान झालेल्या ७७,५७३.१८ हेक्टर क्षेत्रामध्ये ४७३३६ हेक्टर जिरायत, २४ हजार ७४३ हेक्टर बागायत तर ५४३२ हेक्टर फळ पिकांचा समावेश आहे.

नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी

मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत १४ ते १९ मार्च दरम्यान आलेल्या नैसर्गिक आपत्तीत सहा व्यक्तींचा मृत्यू झाला असून ३६ व्यक्ती जखमी झाले आहेत.

मृत व्यक्तींमध्ये परभणीतील पाच व लातूरमधील एकाचा समावेश आहे. जखमी व्यक्तींमध्ये नांदेडमधील ३१ परभणीतील ४ व बीडमधील एका व्यक्तीचा समावेश आहे.

७६ जनावरांचाही मृत्यू

सहा दिवसांपासून या नैसर्गिक आपत्ती दरम्यान आठही जिल्ह्यांतील ७६ लहान, मोठ्या जनावरांचाही मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या जनावरांमध्ये २१ मोठ्या ५५ लहान जनावरांचा समावेश आहे.

मृत मोठ्या ५५ जनावरांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक, जालना ३, परभणी ७, हिंगोली २, नांदेड मधील १९ बीड मधील १२ लातूर मधील आठ व उस्मानाबादमधील तीन जनावरांचा समावेश आहे.

दुसरीकडे मृत पावलेल्या २१ लहान जनावरांमध्ये जालन्यातील १२, परभणीतील १, नांदेडमधील ६ व बीडमधील २ जनावरांचा समावेश असल्याची माहिती विभागीय महसूल प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

केवळ २ टक्केच पंचनामे

प्राथमिक अंदाजानुसार, नुकसान झालेल्या एकूण क्षेत्रापैकी केवळ हिंगोली, नांदेड व लातूर या तीन जिल्ह्यांतील २०३२ शेतकऱ्यांच्या १३८४ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे १९ मार्चपर्यंत पूर्ण झाले. नुकसान झालेल्या क्षेत्राच्या तुलनेत केवळ दोन टक्के आहे.

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी प्रशासनातील विविध संघटनांचा संप सुरू आहे. महसूल, कृषी आणि पंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या संपातील सहभाग आहे. त्याचा थेट परिणाम नुकसानग्रस्त भागाच्या पंचनाम्याच्या गतीवर होताना दिसतो आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flight Tickets Prices : सोलापूरहून मुंबई, गोवा विमान प्रवासाचे तिकीट दर जाहीर

Ballot Paper Petition : ‘बॅलेट पेपर’बाबतची याचिका फेटाळली

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

SCROLL FOR NEXT