Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : नुकसानीचे क्षेत्र २० हजार हेक्टरवर जाण्याचा धोका

जिल्ह्यात परतीच्या पावसाने कहर केला आहे. दररोज पाऊस येत असल्याने नुकसानीचे क्षेत्र २० हजार हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : जिल्ह्यात परतीच्या पावसाने (Heavy Rainfall) कहर केला आहे. दररोज पाऊस येत असल्याने नुकसानीचे क्षेत्र २० हजार हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. अतिवृष्टीची (Wet Drought) मदत शासनाने जाहीर (Government Aid) केल्याने आता शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून (Crop Insurance Company) मदत मिळाल्यास शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे.

यंदा अतिवृष्टीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. जुलै व ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे चार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. अजूनही पाऊस गेलेला नाही. दररोज पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी सातत्याने वाढत आहेत. जुलै महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अजूनही थांबलेला नाही. परिणामी, लाखो हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत.

अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली असून, थोडा दिलासा मिळाला असला तरी परतीच्या पावसाने पुन्हा शेतकऱ्यांसमोर संकट उभे केले आहे. ऑक्टोबर महिन्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसाने नुकसानीचे क्षेत्र २० हजार हेक्टरपर्यंत जाण्याचा धोका वाढला आहे. तशी शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

सतत पाऊस सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर पीक क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत जाहीर केली आहे. त्यामुळे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठी पुन्हा मदत देण्याची शक्यता कमी आहे.

परिणामी आता शेतकऱ्यांच्या सर्व नजरा पीकविमा कंपनीकडे लागल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. अशा शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे. इतर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याचा धोका वाढला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT