Agriculture Department Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture : ‘कृषी सेवा वर्ग-२’ संघटना विविध मागण्यांवरून आक्रमक

औरंगाबाद येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय व लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील कृषी अधिकारी सहभागी झाले होते.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : राज्यभरातील महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग-२ राजपत्रित अधिकारी (Agri Officers) सात मागण्यांवरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यातील आठही विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. ९) धरणे (Dharana Agitation) दिले. विशेष म्हणजे एक दिवसाची रजा टाकून अधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

औरंगाबाद येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय व लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील कृषी अधिकारी सहभागी झाले होते. पहिल्या दोन टप्प्यांत केलेल्या आंदोलनानंतर शासनाने दखल न घेतल्याने धरणे दिली जात आहेत. यानंतरही न्याय न मिळाल्यास आंदोलनाची धार तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

संघटनेच्या प्रमुख मागण्या

वर्ग २ संवर्गाची सेवा ज्येष्ठता सूची १५ दिवसांच्या कालबद्ध वेळेत अंतिम करून पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने राबवावी,कृषी उपसंचालक संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करून एमपीएससीद्वारे पदभरती व्हावी, कृषी उपसंचालक संवर्गाचे संख्याबळ प्रतिनियुक्तीचे पदे वगळता ४०० पर्यंत वाढवावे, एमपीएससीद्वारे फक्त तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी हीच पदे भरण्यात यावी, जिल्हास्तरावर अतिरिक्त प्रकल्प व्यवस्थापक कृषी उपसंचालक

दर्जाचे पद तसेच ‘आत्मा’अंतर्गत कृषी उपसंचालक दर्जाचे एक पदपूर्वी प्रमाणे पुनर्जीवित करावेत, आस्थापना, सांख्यिकी, मनरेगा, अकाउंट्ससाठी राज्य ते तालुका स्तरापर्यंत स्वतंत्र शाखा निर्माण करावी, महानगर पालिका क्षेत्रात शेतकऱ्यांचे शेतमाल विपणनच्या दृष्टीने स्वत्रंत चमू निर्माण करावेत, कृषी विभागाच्या योजना राबविणेसाठी पुरेपूर सुविधा पुरविणे.

शेतकऱ्यांना कोणताही अडथळा न येऊ देता आजवर कृषी अधिकाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या कार्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शासनाने अंत न पाहता मागण्यांविषयी न्यायाची भूमिका घ्यावी.
दीपक गवळी, कोषाध्यक्ष, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग-२ राजपत्रित अधिकारी कल्याणकारी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गहू-करडईची आवक घटली, आल्याचे दर स्थिर; पपई-फ्लॉवर दर टिकून व तेजीत

Leopard Terror : खानदेशात पर्वतीय भागात बिबट्यांची दहशत

Banana Research Center : सोलापूर जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र सुरू करावे

Crop Damage : कंत्राटदाराच्या दुर्लक्षितपणामुळे शेतीपिकाचे मोठे नुकसान

Gold Loan Scam : खोट्या सोन्याप्रकरणी सहा शाखाधिकारी निलंबित

SCROLL FOR NEXT