Solar Power  Agrowon
ताज्या बातम्या

Solar Project : ‘सौर कृषी’साठी सोलापूर जिल्ह्यात हवी दहा हजार एकर जमीन

Agriculture Solar Scheme : दिवसा शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यासाठी पुणे प्रादेशिक विभागात ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना - २.०’ अंतर्गत ५ हजार ८६८ मेगावॅट सौर ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

Team Agrowon

Solapur News : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना- २.०’ अंतर्गत जिल्ह्यासाठी २०३४ मेगावॉट सौर वीजनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी १० हजार १७० एकर जमिनीची आवश्यकता आहे. त्यासाठी महावितरणने शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर जमीन घेण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत.

दिवसा शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यासाठी पुणे प्रादेशिक विभागात ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना - २.०’ अंतर्गत ५ हजार ८६८ मेगावॅट सौर ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

यासाठी पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ८७७ एकर शासकीय जमीन उपलब्ध झालेली आहे. तर एकूण ६०४ शेतकऱ्यांनी जमीन भाडेतत्त्वावर देण्यासाठी अर्ज केले आहेत.

त्यापैकी १४१ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. यातून १ हजार ८२३ एकर जागा मिळणार आहे. उर्वरित अर्जावर कारवाई सुरू आहे. या योजनेनुसार डिसेंबर २०२५ पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किमान ३० टक्के कृषी फीडर्स सौरऊर्जेवर चालविण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली.

‘दिवसा आठ तास वीज मिळणार’

‘‘युद्धपातळीवर ही योजना राबविण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे सध्या शेतीला दिवसा आणि रात्री असा वीजपुरवठा केला जातो. रात्री शेतीला वीज मिळवत असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या योजनेमुळे शेतीसाठी दिवसा आठ तास भरवशाचा वीजपुरवठा होणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे,’’ असे आवाहन नाळे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement: गंगाखेड केंद्रावर साडेतीन हजार क्विंटल सोयाबीन खरेदी

Swachh Bharat Mission: हिंगोली जिल्ह्यात ‘प्लॅस्टिक कचरा मुक्त गाव’ अभियान विशेष मोहीम

Farmers Compensation: परभणीत अतिवृष्टी अनुदानाचे ४२५ पैकी ३४२ कोटी रुपये वितरीत

Crop Loan: कर्ज वसुलीला स्थगिती तरी सेंटलमेंटच्या आडून तगादा

Vegetable Farming: दोडका उत्पादनात गुणवत्ता, दर्जा राखण्यावर भर 

SCROLL FOR NEXT