KCR  Agrowon
ताज्या बातम्या

KCR In Pandharpur : आम्ही फक्त शेतकऱ्यांची टीम : के. चंद्रशेखर राव

BRS Rally In Pandharpur : केसीआरला भाजपची ए टीम, बी टीम असे बोलतात, पण मी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील लोकांना सांगतो की, बीआरएस कोणाचीही टीम नाही, आमचा स्वतःचा पक्ष आहे.

Team Agrowon

Solapur News : केसीआरला भाजपची ए टीम, बी टीम असे बोलतात, पण मी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील लोकांना सांगतो की, बीआरएस कोणाचीही टीम नाही, आमचा स्वतःचा पक्ष आहे. आम्हाला कोणाची ए टीम अथवा बी टीम बनण्याची गरज नाही.

आम्ही शेतकऱ्यांची टीम आहोत, देशात ७० कोटी शेतकरी आहेत, हे सर्व शेतकरी बीआरएस सोबत आहेत, अशा शब्दात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या विरोधकांना मंगळवारी (ता. २७) येथे उत्तर दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगिरथ भालके यांनी सरकोली (ता. पंढरपूर) येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात भारत राष्ट्र समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. या सभेला मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासह त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ, आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेते तसेच, महाराष्ट्रातील माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, माणिक कदम हे पदाधिकारी उपस्थित होते. प्रवेशानंतर झालेल्या कार्यक्रमात केसीआर बोलत होते.

श्री. राव म्हणाले, ज्यांना फळांची अपेक्षा असते, त्यांनी फळाची झाडे लावली पाहिजेत. तुम्ही काट्याचे झाड लावून फळाची अपेक्षा करू शकत नाही. त्यामुळे आपल्या मतांमध्ये फाटाफूट झाली नाही पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे.

मराठवाड्यातील लोक म्हणतात पश्चिम महाराष्ट्राचे चांगले आहे. पण पश्चिम महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचेही प्रश्न फार वेगळे नाहीत. शेतकऱ्यांना मोफत वीज नाही, लागवडीसाठी खर्च मिळत नाही, असेही केसीआर यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारची डिजिटल इंडिया सिस्टिम महाराष्ट्र सरकारने का सुरू केली नाही, असा प्रश्नही त्यांनी केला. भगिरथ भालके यांनी त्यांच्या प्रवेशावर स्थानिक नेतेमंडळींच्या बोलण्यावर आक्षेप घेतला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण या पक्षात जात आहोत, असे सांगितले. तसेच तेलंगणा सरकारच्या एक-दोन योजना जरी महाराष्ट्रात राबवल्या, तर इथल्या शेतकऱ्यांच्या मोठ्या अडचणी दूर होतील, असे सांगितले.

शेतकऱ्यांच्या अंगठ्याशिवाय मालकी हक्कात बदल नाही

तेलंगणात संबंधित शेतकऱ्याने अंगठा (बायोमेट्रीक) लावला तरच जमिनीचा मालकी हक्क बदलतो. जमिनीची मालकी तलाठी, महसूल इन्स्पेक्टर, विभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, महसूल सचिव, महसूल मंत्री, मुख्य सचिव किंवा मुख्यमंत्रीही परस्पर शेतकऱ्यांच्या जमिनीचा मालकी हक्क बदलू शकत नाही, तशी यंत्रणाच आम्ही तयार केली आहे, मूळात तलाठी ही यंत्रणाच बरखास्त केली पाहिजे, आम्हाला जाणीव आहे, ते आम्हाला मत टाकणार नाहीत, पण हरकत नाही, असेही ते म्हणाले.

विठ्ठल-रुक्मिणीचे घेतले दर्शन

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपल्या मंत्रिमंडळ आणि पदाधिकऱ्यांच्या सुमारे ३०० गाड्यांच्या ताफ्यासह सोलापुरात सोमवारी मुक्कामासाठी दाखल झाले. त्यानंतर मंगळवारी (ता. २७) सकाळी त्यांनी पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर समितीच्या वतीने त्यांचे स्वागत केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT