BRS Party Office: बीएसआरचं पहिलं पक्ष कार्यालय फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात!

Team Agrowon

भारत राष्ट्र समिती

तेलंगणातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षानं मिशन महाराष्ट्रची जय्यत तयारी सुरू केलीय.

BRS Party Office | Agrowon

पहिलं पक्ष कार्यालय

मराठवाड्यात सभांची राळ उडवल्यानंतर आता विदर्भातील नागपूर येथे बीआरएसचं हिलं पक्ष कार्यालय उभारण्यात येतंय.

BRS Party Office | Agrowon

बीआरएसचे अध्यक्ष

या कार्यालयाचं उद्घाटन तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे अध्यक्ष चंद्रशेखर राव यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १५) करण्यात आलं.

BRS Party Office | Agrowon

वर्धा रोडवरील साई मंदिर

वर्धा रोडवरील साई मंदिराजवळ बीआरएसने कार्यालय राज्यातील पहिलं पक्ष कार्यालय दिमाखात उभारलंय.

BRS Party Office | Agrowon

नांदेड जिल्ह्यात जंगी सभा

पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनानंतर चंद्रशेखर राव पक्ष कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहेत. यापूर्वी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात जंगी सभा घेत कॉँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना शह देण्याचा प्रयत्न चंद्रशेखरराव यांनी केला.

BRS Party Office | Agrowon

फडणवीस यांचा बालेकिल्ला

तर विदर्भातील नागपूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला आहे. याच बालेकिल्ल्यात चंद्रशेखर राव यांनी धडक मारत पक्ष कार्यालय उभारलंय.

BRS Party Office | Agrowon
Rupali Chakankar | Agrowon