paddy Farming  Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Farming : महिलांनी जाणले भात शेतीचे तंत्रज्ञान

Paddy Farming Technique : भात विषयावरील या शेतीशाळेच्या सुरुवातीला सहभागी महिलांनी प्रतिज्ञा म्हटली. त्यानंतर फुटवे येण्याच्या अवस्था तसेच खत व्यवस्थापनातील नत्राची दुसरी मात्रा यावर चर्चा करण्यात आली.

Team Agrowon

Nagpur News : बाळासाहेब ठाकरे ग्रामीण कृषी परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) तसेच आत्मा यांच्या संयुक्‍त सहकार्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महिलांसाठी रामटेक येथे शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. कुमुदिनी हिंगे यांच्या शेतावर आयोजित या शेतीशाळेत माहितीची उजळी केली.

भात विषयावरील या शेतीशाळेच्या सुरुवातीला सहभागी महिलांनी प्रतिज्ञा म्हटली. त्यानंतर फुटवे येण्याच्या अवस्था तसेच खत व्यवस्थापनातील नत्राची दुसरी मात्रा यावर चर्चा करण्यात आली. भात पिकावर सद्यःस्थितीत येणाऱ्या किडरोगांवरही यावेळी मंथन झाले.

त्यामध्ये खोडकिडा, गादमाशी, मावा, तपकिरी तुडतुडे, पाने गुंडाळणारी आणि लष्करी अळी, हिरवे तुडतुडे तसेच रोगांमध्ये करपा कड्या आणि करपा कानी यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. या किडरोगांचा प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी माहिती देण्यात आली. फिल्ड व्हिजिट करून भात पिकाचे भिंगाचे साहाय्याने निरीक्षक करण्यात आले.

त्याआधारे पिकावर कोणताही किडरोग आढळून आले नाही. पाच सेंटीमिटर किंवा दोन इंच पाण्याची पातळी फुटवे येण्याच्या वेळी ठेवावी व पीक फुलोरा अवस्थेत आल्यानंतर पाच इंच ठेवायचे आहे. नंतर प्रती चूड किती फुटवे आले त्याची मोजणी करण्यात आली.

मोजणीत ३० फूट असल्याचे स्पष्ट झाले. मित्र व शत्रू किडीतील फरक, निरीक्षणाकरीता कामगंध सापळे प्रती हेक्‍टर चार ते पाच लावण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राजेश दोनोडे, शेतकरी कंपनी संचालिका दुर्गा लोंढे (हिंगे), अनंतिका मेश्राम, धनंजय तांबुलकर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT