Crop Loan
Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : मराठवाड्यात कर्जपुरवठ्याचं घोडे अडलेलेच

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप हंगामासाठी कर्जपुरवठ्याचे (Kharif Crop Loan) घोडं अजूनही अडलेलच असल्याचे चित्र आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत आजही केवळ ७६ टक्केच कर्जपुरवठा (Crop Loan Supply) झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वेळेत व खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा (Agriculture Credit) करण्याची शासनाची घोषणा करण्यापुरतीच मर्यादित राहिली आहे.

यंदा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात खरिपाच्या हंगामासाठी ११३२८ कोटी ४२ लाख ८२ हजार रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट विविध बँकांना देण्यात आले होते. प्रत्यक्षात या बँकांनी उद्दिष्टाच्या तुलनेत ७६.३९ टक्के उद्दिष्टपूर्ती करत १२ लाख ११ हजार २ शेतकऱ्यांना ८६५३ कोटी ४२ लाख ८२ हजार रुपयांचा कर्जपुरवठा केला.

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वांत जास्त ९०.३५ टक्के, तर परभणी जिल्ह्यात सर्वांत कमी ६०.४७ टक्के कर्ज पुरवठ्याची उद्दिष्टपूर्ती केली गेली आहे. शेतकऱ्यांना वेळेत व हंगामापूर्वी कर्जपुरवठा करण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी आढावा बैठका, ऑनलाइन अर्ज व सूचनांचा सपाटा लावला गेला. परंतु अपवाद वगळता बँकांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जपुरवठा विषयी आपली अनास्था दाखवून दिली आहे.

उद्दिष्ट व प्रत्यक्ष कर्जपुरवठा

औरंगाबाद जिल्हा

उद्दिष्ट १३५४ कोटी ५९ लाख १७ हजार

कर्जपुरवठा १२२३ कोटी ९१ लाख ५४ हजार

शेतकरी १७९९११

टक्केवारी ९०.३५

जालना जिल्हा

उद्दिष्ट १२१९ कोटी ८९ लाख १६

कर्जपुरवठा ९२९ कोटी ३९ लाख ५४ हजार

शेतकरी १३१८९७

टक्केवारी ७६.१९

परभणी जिल्हा

उद्दिष्ट १२०४ कोटी १५ लाख ३४ हजार

कर्जपुरवठा ७२८ कोटी १४ लाख ४३ हजार

शेतकरी ९७९६६

टक्केवारी -६०.४७

हिंगोली जिल्हा

उद्दिष्ट ८४० कोटी

कर्जपुरवठा ५४५ कोटी ३० लाख १२ हजार

शेतकरी ८२८२५

टक्केवारी-६४.९२

लातूर जिल्हा

उद्दिष्ट २००० कोटी

कर्जपुरवठा १६२९ कोटी १५ लाख २८ हजार

शेतकरी २५६०११

टक्केवारी ८१.४६

उस्मानाबाद जिल्हा

उद्दिष्ट १३६८ कोटी २० लाख

कर्जपुरवठा ९५३ कोटी चौदा लाख

शेतकरी ११५३६२

टक्केवारी ६९.६६

बीड जिल्हा

उद्दिष्ट १७६० कोटी

कर्जपुरवठा १३५० कोटी ४७ लाख ९१ हजार

शेतकरी १७३०९२

टक्केवारी ७६.७३

नांदेड जिल्हा

उद्दिष्ट १५८१ कोटी ५९ लाख १५ हजार

कर्जपुरवठा १२९३ कोटी ९० लाख

शेतकरी १७३ ९३८

टक्केवारी ८१.८१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT