Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : अडचणीतील शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घ्या ः जयंत पाटील

राज्यात पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीची स्थिती लक्षात घेत विधानसभेत विशेष प्रस्ताव ठेवत पीडित कुटुंब, शेतकऱ्यांना तातडीने मदत जारी करण्यासंदर्भात विरोधी पक्ष म्हणून मदतीची मागणी केली.

टीम ॲग्रोवन

वर्धा : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान (Farmer Loss Due To Heavy Rain) झाले. या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई (Compensation) जाहीर केली. पण त्यांपैकी एक छदामही त्यांना मिळाला नाही. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकरिता या घोषणाबाज सरकारने ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंगळवारी (ता. ३१) ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीची स्थिती लक्षात घेत विधानसभेत विशेष प्रस्ताव ठेवत पीडित कुटुंब, शेतकऱ्यांना तातडीने मदत जारी करण्यासंदर्भात विरोधी पक्ष म्हणून मदतीची मागणी केली. राज्य सरकारने मदतीची घोषणाही केली. मात्र अद्याप एकाही शेतकऱ्याला ही मदत मिळालेली नाही. मदतीच्या नावावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाने केले आहे. सरकारमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका दिसत नाही. त्यामुळे अद्याप राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याला शासनाने मदत दिली नाही, असा टोला राज्य सरकारला लगावला.

न्याय व्यवस्थाही नियंत्रणात

राज्यासह देशातही शिवसेनेतून फुटलेला शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांचे प्रकरण न्यायालयात आहे. सध्याची एकूण परिस्थिती आता जनतेपासून लपून राहिलेली नाही. त्यामुळे देशात न्याय व्यवस्था जिवंत असेल, तर या प्रकरणी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना न्याय नक्की मिळेल, असा उपरोधिक टोला जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, की शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटातील एका आमदाराने आम्ही शिवसेनेच्या न्यायालयीन प्रकरणाला आणखी पाच वर्षे लांबवू शकतो, असे वक्तव्य केले होते. यावरून सध्या सत्ताधाऱ्यांनी न्यायव्यवस्थाही नियंत्रणात आणली आहे की, काय, अशी शंका येत आहे. तरीही आमचा न्याय व्यवस्थेवर विश्‍वास आहे. म्हणून देशात खरच न्याय व्यवस्था जिवंत आणि स्वतंत्र असेल, तर न्याय नक्की मिळेल, असे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Update: पाऊस उघडीप देण्याची शक्यता; राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या सरींचा अंदाज

Farmer Relief : ‘गुरुदत्त शुगर्स’च्या मदतीने पूरग्रस्त सुखावले

Crop Loss inspection: २६ जिल्ह्यांमध्ये पंचनामे रखडले; दिवाळीपूर्वी भरपाई मिळेल?

PDKV Akola : कृषी विद्यापीठ विकसित तंत्रज्ञान वापरा

Sangli Rainfall : सांगलीत सप्टेंबरमध्ये १४६ टक्के पाऊस

SCROLL FOR NEXT