Crop Insurance
Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : सरसकट नुकसान भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’चा बाळापुरात मोर्चा

टीम ॲग्रोवन

अकोला ः जिल्ह्यात नुकसान होऊन शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी शेतमजुरांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani SHetkari Sangtna) वतीने शुक्रवारी (ता. २१) बाळापूर तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष गणेश खुमकर (Ganesh Khumkar) यांच्या नेतृत्वात मोर्चा तहसीलवर पोहोचला व तेथे जाहीर सभा झाली.

या वेळी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी पीक नुकसान होऊनही विमा कंपन्या कारणे पुढे करीत भरपाई देत नाहीत. या विमा कंपन्यांचे व सरकारचे साटेलोटे आहे. कोणताही राजकीय पक्ष शेतकऱ्यांचा वाली नाही म्हणून आता शेतकऱ्यांनी संघटित होऊन लढाई लढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

सगळीकडे सार्वत्रिक नुकसान होऊनही सत्ताधारी मात्र पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला देत असल्याने हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहत असल्याचे सांगत खुमकर यांनी सरकारवर टीका केली. मराठवाडा अध्यक्ष बंगाळे पाटील यांनी शेतकऱ्यांनी यापुढे स्वाभिमानीच्या बॅनरखाली संघटित होणे हीच काळाची गरज असल्याचे सांगितले. मोर्चात आलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज व मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

या वेळी ‘स्वाभिमानी’चे पंकज दुतोंडे, रोशन देशमुख, धनंजय कोरडे, शिवा पवार, प्रवीण राऊत, गोपाल कुकडे, अविनाश पाटील, सागर तायडे, प्रल्हाद तांबडे, संजय ठाकरे यांच्यासह शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT