Cow Milk Rate agrowon
ताज्या बातम्या

Cow Milk Rate : गाय दूध दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, महामार्ग रोखला

sandeep Shirguppe

Ahmednagar News : राज्य सरकारने नेमलेल्या समितीच्या शिफारशीवरून गाईच्या दुधाला ३४ रुपये दर जाहीर केला. परंतु फॅट व ‘एफएनएस’च्या रिटर्नचे दर दूध संघ चालकांनी मनमानी पद्धतीने वाढविले आहे. यामुळे पूर्वीपेक्षा शेतकऱ्यांच्या दुधाला कमी दर मिळेल. त्यामुळे शासनाची ही फसवी दूधदरवाढ असून, ही मनमानी थांबवावी.

तर रिटर्नचे दर पूर्वीप्रमाणे ठेवावेत, या मागणीसाठी राहुरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कृषी बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अहमदनगर-मनमाड हा महामार्ग स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडवला होता.

दूध संघचालक तुपाशी... शेतकरी उपाशी अशी घोषणाबाजी यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. दूध दरासह दुधाला तेलंगणा सरकारप्रमाणे पाच रुपयांचे अनुदान देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. या महामार्गावरच दुधाने अभिषेक घालण्यात आला. यामुळे काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.

या आहेत स्वाभिमानीच्या मागण्या

दुधाच्या ३.२ या गुणप्रतीस लिटरला ३४ रुपयांचा भाव मिळावा. एसएनएफचा २० पैसे तर फॅटचा ३० पैसे दर निश्चित करावा. तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांना प्रती लिटर पाच रुपयांचे अनुदान देण्यात यावे.

पशुधनाला मोफत विमा सरंक्षण देण्यात यावे. डबल टोन दुधावर बंदी आणावी. या प्रमुख मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT