KVK Baramati Agrowon
ताज्या बातम्या

Grape, Pomegranate : द्राक्ष, डाळिंब पिकांतून शाश्वत उत्पन्न शक्य

बारामती कृषी विज्ञान केंद्र, शासनाचा कृषी विभाग, आत्मा संस्था (पुणे) आणि इस्राईल केमिकल लिमिटेडतर्फे आयोजित द्राक्ष, डाळिंब पीक परिसंवादाला पुणे, सातारा येथील शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

टीम ॲग्रोवन

माळेगाव ः नवतंत्र (New Agriculture Technology), नवसंकल्पनांची शेतीला जोड देण्याच्या उद्देशाने अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट बारामतीच्या (Agriculture Development Trust Baramati) कृषी विज्ञान केंद्रात द्राक्ष व डाळिंब पीक परिसंवाद (Pomegranate Grape Crop Seminar) घेण्यात आला. त्यास शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कोणतीही गोष्ट नियोजनपूर्वक, दूरदृष्टी ठेवून केली आणि त्याला आधुनिकतेची जोड दिल्यास निश्चितपणे द्राक्ष, डाळिंब आदी पिकांतून शाश्वत उत्पन्न (Sustainable Income From Pomegranate And Grape Crop) मिळू शकते, असा मोलाचा सल्ला शेतकऱ्यांना या परिसंवादातून मिळाला.

बारामती कृषी विज्ञान केंद्र, शासनाचा कृषी विभाग, आत्मा संस्था (पुणे) आणि इस्राईल केमिकल लिमिटेडतर्फे आयोजित द्राक्ष, डाळिंब पीक परिसंवादाला पुणे, सातारा येथील शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. अध्यक्षस्थानी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार होते. या वेळी इस्राईल केमिकल लिमिटेडचे अध्यक्ष अनंत कुलकर्णी,  इस्राईलचे शास्त्रज्ञ डॉ. मेनाचेम असारफ, शास्त्रज्ञ डॉ. उरी येर्मीयाहु, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, महाराष्ट्र डाळिंब संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब काटे,  द्राक्ष संशोधन केंद्र (पुणे) शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत निकुंभे, डॉ. युक्ती वर्मा,  शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ पोखरे आदी उपस्थित होते.

कुलकर्णी यांनी पानदेठ परिक्षणासाठी सॉफ्टवेअरवर काम सुरू असल्याचे सांगितले. डॉ. येर्मीयाहु म्हणाले, ‘‘डाळिंबामध्ये नत्र, स्फुरद, पालाश या खतांचा डोस डाळिंब पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेत दिल्यानंतर शेतकऱ्यांसाठी उपयोग असलेल्या खत मात्रा शोधून काढल्या आहेत. संशोधनात्मक खत मात्रा दिलेल्या फळांची गुणवत्ता, पिकावरील रोग कीड नियंत्रण, अधिक उत्पादन या सर्वांवर योग्य परिणाम होऊन चांगला निकाल मिळाला आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Gokul Milk : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; आता ‘गोकुळ’ निशाण्यावर

Jalgaon Assembly Election Result 2024 : खानदेशात महायुतीची मुसंडी; काँग्रेसचे दिग्गज पराभूत

SCROLL FOR NEXT