Crop Damage Survey Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : वादळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू

गारांच्या तडाख्यामुळे द्राक्ष, कांदा, कलिंगड, गहू या प्रमुख पिकांसह आंबा व इतर उभ्या भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Team Agrowon

Crop Damage News नारायणगाव, जि. पुणे ः जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निमगाव सावा, खोडद, हिवरेतर्फे नारायणगाव, पारगावतर्फे आळे, झापवाडी, मंगरूळ, साकोरी, रानमळा, आर्वी, गुंजाळवाडी या गावांत शनिवारी (ता. १८) दुपारी गारपिटीसह (Hailstorm) झालेल्या वादळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. शेती पिकांचे पंचनामे (Crop Damage Survey) रविवारपासून (ता. १९) सुरू केले आहेत, अशी माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली.

तालुक्याच्या पूर्व भागात शनिवारी दुपारी गारांचा वर्षाव झाला. गारांच्या तडाख्यामुळे द्राक्ष, कांदा, कलिंगड, गहू या प्रमुख पिकांसह आंबा व इतर उभ्या भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

मागील पाच दिवस मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडल्याने निर्यातक्षम परिपक्व द्राक्ष मण्यांना तडे गेले आहेत. त्यामुळे द्राक्ष मातीमोल झाली आहेत. रविवारी तहसीलदार सबनीस, गटविकास अधिकारी रमेशचंद्र माळी यांनी पथकासह पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

त्यानंतर पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांनी आपल्या भागातील गावकामगार तलाठी यांना नुकसानीची माहिती कळवावी, असे आवाहन तहसीलदार सबनीस यांनी केले.

आर्थिक मदतीची मागणी

गारपीट व अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या जुन्नर तालुक्यातील पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने व आर्थिक मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार अतुल बेनके यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT