Sunflower Production
Sunflower Production Agrowon
ताज्या बातम्या

Sunflower Production : खानदेशात सूर्यफुलाचे क्षेत्र वाढणार

टीम ॲग्रोवन

जळगाव ः खानदेशात यंदा सूर्यफुलाची पेरणी (Sunflower Sowing) वाढणार आहे. उडीद, मूग पिकांखाली (Mung Crop) रिकाम्या झालेल्या क्षेत्रात सूर्यफूल पीक पेरणीचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. या महिन्यातच पेरणी केली जाईल. बाजारात बियाणे काही कंपन्यांकडून प्राप्त झाले आहे. दोन किलो बियाण्याचे दर १२०० ते १५०० रुपये असे आहेत. तापी, गिरणा, अनेर, पांझरा, सुसरी नदीकाठच्या क्षेत्रात पेरणी होईल. काळ्या कसदार जमिनीत पीक जोमात येते.

दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना एकरी १८ ते २० क्विंटल उत्पादन हाती आले होते. त्याला दरही प्रतिक्विंटल साडेपाच हजारांपर्यंत होते. या मुळे मागील दोन वर्षे खानदेशात तीन हजार हेक्टरवर सूर्यफूल पेरणी झाली आहे. यंदाही ही पेरणी तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर होईल. २०२८ पर्यंत खानदेशात सूर्यफूल पेरणी २०० हेक्टरवर देखील केली जात नव्हती. परंतु मागील दोन वर्षांत सतत पेरणी वाढली आहे. मागील हंगामात बियाण्याचा तुटवडा होता. गुजरात, मध्य प्रदेशातून अवैध बियाणे दाखल झाले होते.

त्याची विनापावती २१०० रुपये प्रति दोन किलोस या दरात विक्रीही केली जात होती. यंदा मात्र बियाणे मुबलक असल्याचा दावा कृषी यंत्रणा करीत आहेत. काही भागांत शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. तर काही शेतकरी दसरा सणापूर्वी किंवा या महिन्याच्या अखेरीस पेरणी करतील.

पावसाने उघडीप देण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात चोपडा, अमळनेर, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर, धुळ्यात धुळे, शिरपूर, नंदुरबारात नवापूर, नंदुरबार भागात पेरणी बऱ्यापैकी होईल, असे दिसत आहे. पाऊसमान चांगले आहे. जळगाव जिल्ह्यात १० तालुक्यांत पाऊसमान ९५ टक्क्यांवर आहे.

धुळ्यातही चांगला पाऊस झाला आहे. यामुळे सूर्यफूल पेरणीसाठी अनुकूल स्थिती आहे. मागील हंगामात अनेक शेतकऱ्यांचे पीक सिंचनाविनाच हाती आले होते. कारण पेरणीला व पेरणीनंतरही पाऊस होता. अल्पावधीचे हे पीक असल्याने शेतकरी त्याकडे वळले आहेत. सूर्यफूल घेतल्यानंतर त्यावर मका, ज्वारी आदी पिकेही पुढे घेणे शक्य आहे. अनेक उडीद, मूग उत्पादकांना हवे तसे उत्पादन हाती न आल्याने त्यांनी क्षेत्र रिकामे केले आहे. कृत्रिम जलसाठे मुबलक असल्याने हरभरा पेरणीऐवजी सूर्यफूल पेरणी करण्याचा निर्धार केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT