Summer sowing
Summer sowing Agrowon
ताज्या बातम्या

Summer Sowing : राज्यात यंदा उन्हाळी पिके८६ हजार हेक्टरनी वाढली

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Summer Sowing राज्यात यंदा उन्हाळी क्षेत्रात सरासरीपेक्षा ४८ हजार ८५८ हेक्टरनी, तर गतवर्षीच्या तुलनेत ८६ हजार ६३८ हेक्टरनी वाढ झाली आहे. यंदा राज्यात ३ लाख ९८ हजार ६१७ हेक्टरवर पेरणी (Sowing) झाली आहे. त्यात भात, बाजरी, ज्वारी, मक्याचे क्षेत्रही वाढले आहे. सोयाबीन, भुईमुगाचे क्षेत्र मात्र कमी झाले आहे. यंदा या उन्हाळी पिकांची अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) मोठी हानी झाली आहे.

राज्यात उन्हाळी पिकांचे ३ लाख ४९ हजार ७५९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा आतापर्यंत ३ लाख ९८ हजार ६१७ हेक्टरवर या पिकांची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी ३ लाख ११ हजार ९७९ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा पहिल्यांदाच उन्हाळी भाताची ९२ हजार ४८१ हेक्टरवर, तर सरासरीपेक्षा ८१ हजार हेक्टरवर अधिक पेरणी झाली आहे. बाजरीची पेरणीही गतवर्षीपेक्षा दुप्पट झाली आहे.

राज्यातील जळगावात २६ हजार ६००, नगरमध्ये ९ हजार ६५२, पुण्यात १४ हजार ३३९, सोलापूरमध्ये १२ हजार ७४८, छत्रपती संभाजीनगर १६ हजार ७८१, बीडला १२ हजार ३६१, नांदेडला ३० हजार ३५३, हिंगोलीला ११ हजार ४५३, यवतमाळला १६ हजार ७७३, गोंदियात ७७ हजार २७७, भंडाऱ्यात ६३ हजार ८५७ हेक्टरवर उन्हाळी पिके घेतली आहेत. राज्यातील १७ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक उन्हाळी पिके यंदा घेतली आहेत.

पावसाने मोठे नुकसान

राज्यात महिनाभरापासून सातत्याने अवकाळी पाऊस, गारपीट होत आहे. आतापर्यंत ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील उन्हाळी पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याचा अंदाज आहे. बाजरी, ज्वारी, मका, मूग, सोयाबीन यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

उन्हाळी पिकांची स्थिती

पीक- क्षेत्र (हेक्टर)-सरासरी क्षेत्र

भात-१६४०८९-८३,०११

बाजरी-३४६७०-१७,३९१

ज्वारी-१५१९५-१२,५२३

मका-६०८५९-५८,०१२

मूग-१२४७७-१२,४७७

उडीद-४०६-४०६३

इतर कडधान्य-१६११-९७६८

भुईमूग-७०७२३-९०,६०५

सोयाबीन-२०२५७-२३३५५

सूर्यफूल-६५९७-३०७४

थोडक्यात महत्त्वाचे...

- गतवर्षीच्या तुलनेत भात लागवडीत मोठी वाढ

- बाजरी, ज्वारी, मक्याचे क्षेत्रही वाढले

- सोयाबीन, सूर्यफुलाच्या क्षेत्रात मात्र घट

- १७ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक उन्हाळी पिके

- ५० हजार हेक्टरवर उन्हाळी पिकांना अवकाळीचा फटका

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT