Sugarcane Worker Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Season : ऊसतोड मुकादमाकडून कारखान्याची सात लाखांची फसवणूक

तोडणी मजूर टोळीसाठी त्यांनी समसोद्दीन तडवी याच्याशी संपर्क साधून चौदा मजुरांसाठी करार केला.

Team Agrowon

सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याला (Ajinkyatara Sugar Factory) सात लाख रुपये घेऊन ऊसतोडीची मजूर (Sugarcane Labor) टोळी देतो, असे सांगून प्रत्यक्षात ती टोळी न पुरविता वाहन मालकाची आर्थिक फसवणूक (Fraud) केल्याची फिर्याद वाहन मालक श्रीमंत शिवराम चव्हाण (रा. मापरवाडी, ता. सातारा) यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात नोंदविली आहे.

बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समसोद्दीन उखरडू तडवी (वय ३८, रा. कसबा पिंप्री, पो. फत्तेपूर, ता. जामनेर, जि. जळगाव) व नयूम तडवी (रा. ढालगाव, ता. जामनेर, जि. जळगाव) या दोघांविरुद्ध चव्हाण यांनी ही फिर्याद दाखल केली असून, इतर माहितीनुसार चव्हाण यांनी चालू वर्षीच्या हंगामातील ऊसतोडणी व वाहतुकीसाठी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यासोबत करार केला होता.

तोडणी मजूर टोळीसाठी त्यांनी समसोद्दीन तडवी याच्याशी संपर्क साधून चौदा मजुरांसाठी करार केला. करारानुसार वेळोवेळी कारखाना कार्यस्थळावर प्रत्यक्ष, तसेच मोबाइल बँकिंगद्वारे सात लाख रुपयेदेखील अदा केले होते;

परंतु समसोद्दीन तडवी व नयूम तडवी यांनी कराराप्रमाणे मजूर न पुरवता आपला विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याने हवालदिल झालेल्या चव्हाण यांनी अखेर बोरगाव पोलिस ठाणेत आर्थिक फसवणुकीची फिर्याद दिली. घटनेचा तपास पोलिस हवालदार चव्हाण करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mother Tongue Education: जागविण्या संवेदना, शिकूया मातृभाषा!

Maize Value Chain Development: मका, मागणी अन् मूल्यवर्धन

Paddy Nursery: धूळवाफ्यावरील भात रोपवाटिकांना संजीवनी

Vasantrao Naik Awards: वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे शेतीविषयक पुरस्कार जाहीर

Agriculture Water Scarcity: पाणीटंचाईने बारामतीतील अडीच हजार एकर क्षेत्र संकटात

SCROLL FOR NEXT