Sugarcane cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Cultivation : खानदेशात ऊस लागवड स्थिर

खानदेशात उसाखालील क्षेत्र स्थिर असून, नंदुरबार जिल्ह्यात १३ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. खानदेशात सात साखर कारखाने सुरू आहेत. यामुळे गाळपासंबंधी अडचणी कमी असल्याने लागवडही स्थिर आहे.

Team Agrowon

जळगाव ः खानदेशात उसाखालील क्षेत्र (Sugarcane Acreage) स्थिर असून, नंदुरबार जिल्ह्यात १३ हजार हेक्टरवर लागवड (Sugarcane Cultivation) झाली आहे. खानदेशात सात साखर कारखाने (Sugar Mills In Khandesh) सुरू आहेत. यामुळे गाळपासंबंधी (Sugarcane Crushing) अडचणी कमी असल्याने लागवडही स्थिर आहे.

मध्यंतरी खानदेशातील ऊस लागवड १५ हजार हेक्टरवर खाली आली होती. परंतु मागील तीन वर्षांत क्षेत्रात वाढ झाली. जळगाव जिल्ह्यात मागील हंगामातही १२ हजार हेक्टरवर ऊस पीक होते. यंदाही १२ हजार हेक्टरवर जळगावात ऊस आहे.

धुळे जिल्ह्यात चार हजार हेक्टरवर ऊस आहे. यात साक्री व शिरपूर तालुक्यांत ऊस लागवड अधिक आहे. नंदुरबारात १३ हजार हेक्टरवर ऊस असून, शहादा, तळोदा व नवापूर तालुक्यांत ऊस पीक अधिक आहे.

नंदुरबार जिल्ह्यात तीन साखर कारखाने सुरू आहेत. यातील समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील कारखाना जोमात सुरू आहे. या कारखान्याने यंदा काही महिन्यांत पाच लाख टनांवर ऊस गाळप केले आहे. खानदेशात सर्वाधिक ऊस गाळप या कारखान्याने केले.

जळगाव जिल्ह्यात चार साखर कारखाने सुरू आहेत. त्यात जिल्ह्याच्या चारही दिशांना किंवा भागात हे कारखाने काम करीत आहेत.

घोडसगाव (ता. मुक्ताईनगर), न्हावी (ता. यावल), चहार्डी (ता. चोपडा) व भोरस (ता. चाळीसगाव) येथे हे कारखाने सुरू आहेत. नंदुरबारात डोकारे (ता. नवापूर), समशेरपूर (ता. नंदुरबार), पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथे कारखाने सुरू आहेत.

तसेच तळोदा तालुक्यात एक खांडसरी सुरू आहे. यंदा मार्चअखेर खानदेशात १०० टक्के उसाचे गाळप होईल, असे चित्र आहे. यामुळे ऊस लागवड स्थिर आहे. काही भागांत ऊस लागवड कमी झाली आहे. परंतु काही भागांत ऊस लागवड वाढली आहे. यामुळे क्षेत्र स्थिर आहे.

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, भडगाव भागात ऊस लागवड किंचित वाढली आहे. यावल भागातही ऊस लागवड किंचित वाढल्याचे दिसत आहे. पण चोपडा भागात ऊस लागवड कमी झाल्याची माहिती आहे.

धुळ्यातील शिरपुरातही ऊस लागवड किंचित वाढली आहे. परंतु धुळे तालुक्यातील क्षेत्र कमी झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात पाच हजार हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. यापाठोपाठ नवापूर तालुक्यात ऊस पीक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT