Sugarcane
Sugarcane Agrowon
ताज्या बातम्या

संत तुकाराम कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर

टीम ॲग्रोवन

पुणे : मुळशी, मावळ, खेड, हवेली, शिरूर अशा पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कासारसाईतील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे (Sant Tukaram Sugar Mill) कार्यक्षेत्रात यंदाच्या हंगामात आडसाली पूर्वहंगामी, ऊस लागवड करण्याचे धोरण (Sugarcane Cultivation Policy) कारखान्याने जाहीर केले आहे. सर्व तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांनी उसाच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करून पूर्वहंगामी ऊस लागवड (Sugarcane Cultivation) करावी, असे आवाहन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले (nanasaheb Nawale) यांनी केले.

आडसाली ऊस लागवडीसाठी १ जून ते ३१ ऑगस्ट कालावधीत को. एम. ०२६५. को ८६०३२, को. व्ही. एस. आप. १२१२१ (८००५), को. व्ही. एस. आय. १८१२१ जातीची निवड करावी. पूर्वहंगामी ऊस लागवडीसाठी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत को. एम. ०२६५, को ८६०३२, को. व्ही. एस. आय. १२१२१ (८००५), को- ९०५७, को. व्ही. एस. आय. १८१२१ व सुरू ऊस लागवडीसाठी १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारीपर्यंत को-८६०३२, एम. एस. १०००१, को एस. आय. १२१२१ (८००५), को ९०५७, को. व्ही. एस.आय. १८१२१ या जातींची ऊस लागवड शेतकरी करू शकतात.

ऊस लागवड करताना शेतकऱ्यांनी उसाचे निरोगी असे ९ ते १० महिने कालावधीचे कारखान्याने शिफारस केलेल्या बेणे प्लॉटमधील बेणेचा पुरवठा उधारीवर केला जाईल. दोन डोळ्यांची टिपरी वापरून ऊस लागवडीच्या दोन टिपऱ्यांमधील अंतर नऊ इंच ठेवावे. यांत्रिक पद्धतीने ऊसतोड करण्यात येणार असल्याने ऊस लागवड करताना साडेचार फूट अंतराच्या सरीमध्ये ऊस लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांना आडसाली उसाची लागवड रोपापासून करावयाची आहे. त्यांना एक डोळा पद्धतीचे ऊस रोपे तयार करण्याचे काम चालू आहे. रोपे रोखीने अथवा उधारीवर पुरविली जाईल. ऊस लागवडीसाठी जैविक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, द्रवरूप खते व बायोकंपोस्ट खत कारखान्यामार्फत उधारीवर पुरविली जातील,

गाळप केलेल्या चांगल्या उसाचा खोडवा शेतकऱ्यांनी ठेवावा तसेच माती परीक्षण करून योग्य त्या रासायनिक खतांची मात्रा द्यावी. कारखान्याच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी.
बापूसाहेब भेगडे, उपाध्यक्ष, संत तुकाराम साखर कारखाना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT