Child Marriage  Agrowon
ताज्या बातम्या

Child Marriage : बालविवाहाला पायबंद

ठाणे जिल्ह्यात एप्रिल २०२० ते मार्च २०२३ या तीन वर्षांच्या कालावधीत १८ बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.

Team Agrowon

Thane News ठाणे : आजच्या घडीला आपला देश सर्वच क्षेत्रांत प्रगती करीत असून इंटरनेट, मोबाईल, आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण जगासोबत स्पर्धा करीत आहोत.

प्रगत देशात आपली गणना होत आहे. आजही खेड्यापाड्यांतील अनेक मुली बालविवाहासारख्‍या (Child Marriage) प्रथांना बळी पडत असल्याचे चित्र आहे.

त्यात कोरोना काळात हे प्रमाण अधिकच वाढल्याचे दिसून आले. ठाणे जिल्ह्यात एप्रिल २०२० ते मार्च २०२३ या तीन वर्षांच्या कालावधीत १८ बालविवाह रोखण्यात (Prevention Of Child Marriage) जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.

मुलांचे लग्नाचे वय २१; तर मुलींच्या लग्नाचे वय १८ असावे असे कायदा सांगतो. त्यापेक्षा कमी वयात विवाह झाला तर तो बालविवाह समजला जातो.

२००६ मध्‍ये केंद्र सरकारने बालविवाह प्रतिबंधक कायदा नव्याने मंजूर केला; मात्र या कायद्यानुसार बालविवाहास कठोर शिक्षेची तरतूद आहे. या कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने त्‍याचा धाक राहिलेला नाही.

एकीकडे समाजात जनजागृती वाढत असताना प्राप्त तक्रारींचे प्रमाण वाढत असल्याने कारवाईत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. सधन तालुक्यांमध्ये बालविवाहांचे प्रमाण चिंताजनक आहे.

ठाणे जिल्ह्यातील विविध भागांमधून एप्रिल २०२० ते मार्च २०२३ या कालावधीत बालविवाहसंदर्भात १९ तक्रारी जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने कारवाई करीत १८ बालविवाह रोखण्यात यश आले.

१०९८ वर संपर्क साधा!

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ च्या काटेकोर अंमलबजावणीची गरज आहे. अनेकदा मुलींना कोणताही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही. अवैधरीत्या होणाऱ्या बालविवाहासंदर्भात माहिती मिळाल्यास ते रोखण्यासाठी १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येतो.

सर्वाधिक तक्रारी ठाणे तालुक्यात

ठाणे जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाकडे बालविवाहासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक ५ तक्रारी ठाणे आणि कल्याण तालुक्यात नोंदवल्या गेल्या.

त्यापाठोपाठ उल्हासनगर ३, शहापूर आणि भिवंडीमध्ये प्रत्येकी २; तर सर्वांत कमी तक्रारी म्हणजेच १ तक्रार मुरबाड तालुक्यातून नोंदवण्यात आली आहे.

बालविवाह रोखण्यासाठी बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. कमी वयात मुलींचे लग्न लावून दिल्यास, त्यांची शारीरिक वाढ पूर्ण झालेली नसताना त्या गर्भवती राहतात. यातूनच कुपोषणाचे प्रमाणदेखील वाढत आहे. यामुळे या अनिष्ठ रुढी आणि परंपरेच्या जोखडातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बालविवाहाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

- महेंद्र गायकवाड, महिला व बालविकास अधिकारी, ठाणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT