Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Eknath Shinde : मराठवाड्यासाठी भरीव निधी देणार : मुख्यमंत्री शिंदे

विविध विकास कामांसाठी शासन भरीव निधी देत आहे. या सर्व कामांचा यापुढे मंत्रालय स्तरावरून नियमित आढावा घेतला जाईल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद ः ‘‘मराठवाड्यातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत. विविध विकास कामांसाठी शासन भरीव निधी देत आहे.(Government Funding) या सर्व कामांचा यापुढे मंत्रालय स्तरावरून नियमित आढावा घेतला जाईल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी विविध विकास कामांच्या घोषणाही त्यांनी या वेळी केल्या.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते येथील सिद्धार्थ उद्यानात शनिवारी (ता.१७) ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षासही सुरूवात झाली. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, अभिमन्यू पवार, प्रशांत बंब यांच्यासह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘‘मराठवाडा मुक्तिसंग्राम हे इतिहासातील देदीप्यमान पर्व आहे. आजच्या पिढीला या इतिहासाची माहिती देणे काळाची गरज आहे. मराठवाड्याच्या गावागावांत हा संग्राम लढला गेला. यात जिवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर गावच्या दगडाबाई शेळके यांच्यासारख्या अनेक महिलांच्या योगदानाची आज आठवण होते.’’

मुख्यमंत्र्यांनी केल्या या घोषणा...

औरंगाबाद जिल्हा : ‘मराठवाडा वाटर ग्रीड’मध्ये नांदूर मधमेश्वर प्रकल्पातील ४ धरणांचा समावेश करून बंद पाईपलाईनव्दारे पाणी देणार. मध्य गोदावरी उपखोऱ्यात ४४ प्रकल्पांना शासन मान्यता, शनिदेव उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामास मान्यता. जायकवाडी धरणाच्या कालव्याची व वितरिकांची दुरुस्ती, म्हैसमाळ येथे तारांगण बांधकाम, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविणे.

परभणी जिल्हा : शहरासाठी पाणीपुरवठा योजना, शहरासाठी भुयारी गटार योजना, गटार योजनेच्या मल शुद्धीकरण केंद्रासाठी कृषी विद्यापीठाची जागा, स्त्री रुग्णालयासाठी निधी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी जागा, छत्रपती शिवाजी महाराज (नाना-नानी) उद्यानाचे आधुनिकीकरण व सुशोभीकरण, जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामासाठी कृषी विद्यापीठाची जमीन, धारासूर येथील गुप्तेश्वर या प्राचीन मंदिराच्या विकासासाठी निधी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, परभणी गोरक्षण ट्रस्टच्या मालकीची जागा जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करणार.

हिंगोली जिल्हा : श्रीक्षेत्र औंढा नागनाथ मंदिर परिसराच्या विकास, हळद संशोधन व प्रक्रिया केंद्रासाठी जागा, श्रीसंत नामदेव मंदिर संस्थान परिसराचा विकास, कुरुंदा (ता. वसमत) येथे पूर प्रतिबंधक कामे.

नांदेड जिल्हा : जिल्हा क्रीडा संकुलासाठी जागा, नांदेड महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापनासाठी निधी, घनकचरा प्रकल्पांतर्गत बायोमायनिंग प्रक्रिया प्रकल्प, नांदेड शहरातील भुयारी गटार योजना.

बीड जिल्हा : जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय इमारतीचे काम.

लातूर जिल्हा : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामासाठी कृषी महाविद्यालयाची जागा, विमानतळाच्या अतिरिक्त भूसंपादनासाठी निधी, ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’मधून लातूर जिल्हा व शहरासाठी प्रकल्प चाकूर येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी जमीन संपादन.

उस्मानाबाद जिल्हा : वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यान्वित करणे, पाणी उपलब्ध होण्यासाठी नदीजोड प्रकल्पात समावेश

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr Panjabrao Deshmukh Memorial Award: डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार मुख्यमंत्र्यांना जाहीर

Kharif Onion Cultivation: लेट खरीप कांद्याची लागवड यंदा अडीच लाख हजार हेक्टरवर

APMC Reforms: ‘बाजार व्यवस्थेवर आता सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण’

Yashwant Factory Land Scam: ‘यशवंत’च्या जमीन खरेदी-विक्रीला स्थगिती

Market Committee Democracy: पणनमंत्र्यांकडील अध्यक्षपद बाजार समित्यांच्या मुळावर: राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT