Sugarcane  Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Farming : ऊस उत्पादनाविषयी शेतकऱ्यांचा पाडेगावात अभ्यास दौरा

Sugarcane Production : या शेतकरी अभ्यास दौऱ्यामध्ये ऊस प्रात्यक्षिक प्लॉट शिवारफेरी, ऊस पिकाबाबत सविस्तर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

Team Agrowon

Pune News : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. ५) ‘एकरी १०० टन ऊस उत्पादन व तंत्रज्ञान’ या विषयावरती राज्यांतर्गत शेतकरी अभ्यास दौरा पाडेगाव (जि. सातारा) येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता.

या शेतकरी अभ्यास दौऱ्यामध्ये ऊस प्रात्यक्षिक प्लॉट शिवारफेरी, ऊस पिकाबाबत सविस्तर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. माधव भुसे यांनी विविध ऊस जातीबाबत, बेणे निवड व बेणे प्रक्रियेबाबत सखोल असे मार्गदर्शन केले. पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन बाबत डॉ. शाळिग्राम गांगुर्डे यांनी माहिती दिली.

तसेच खत व्यवस्थापन या बाबत डॉ. सुभाष घोडके यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. राज्यांतर्गत शेतकरी अभ्यास दौऱ्याचे नियोजन आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर, मंडळ कृषी अधिकारी गणेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय बोडके यांनी केले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

Orange Orchards Crisis: पाण्याअभावी संत्रा बागा संकटात; वाशीममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mango Variety Research: नवसारी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी

Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन

SCROLL FOR NEXT