Millet Festival Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Processing Industry : कृषी प्रक्रिया उद्योगांच्या ‘एक खिडकी’साठी प्रयत्नशील

कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी १४ विभागांच्या परवानग्या घ्याव्या लागतात. तसेच अकृषक जमिनीची अट असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

Team Agrowon

Agriculture Processing मुंबई : ‘‘कृषी प्रक्रिया उद्योग (Processing Industry) सुरू करण्यासाठी १४ विभागांच्या परवानग्या घ्याव्या लागतात. तसेच अकृषक जमिनीची (Non Agriculture Land) अट असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

या अडचणींचा निपटारा करण्यासाठी नाबार्ड एक खिडकी योजना आणण्याचा विचार करत आहे,’’ अशी माहिती नाबार्डचे (NABARD) मुख्य महाव्यवस्थापक जी. के. रावत यांनी दिली.

पणन विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित तृणधान्य महोत्सवात तृणधान्य खरेदीदार आणि विक्रेता संमेलनात ते बोलत होते.

रावत म्हणाले, ‘‘नाबार्डतर्फे ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड या योजनेंतर्गत कृषी प्रकिया उद्योगांना व्याज अनुदान दिले जाते. तसेच स्टोअरेज आणि नॉन स्टोअरेज योजनेंतर्गत भांडवलावरील २५ टक्के अनुदान दिले जाते. या दोन्ही योजनांचा लाभ एकत्रितपणे देण्याच्या मानस आहे.’’

‘सीबडी’चे सरव्यवस्थापक अंजनीकुमार श्रीवास्तव म्हणाले, ‘‘सीबडी या आधी केवळ राइस मिल आणि डाळ मिल्सना अर्थपुरवठा करत होती.

मात्र, त्याचा विस्तार करण्याचा विचार सुरू आहे. लघुउद्योजकांसाठी क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट मीडियम एंटरप्रायझेस आणि ट्रेड योजना आरएक्सआयएल या प्रणालीवरून राबविल्यास त्याचा फायदा कंपन्यांना होईल.’’

पशुसंवर्धन विभागाचे डॉ. गणेश देशपांडे म्हणाले, ‘‘सध्या जनावरांच्या चाऱ्याची आणि पशुखाद्याची कमतरता तृणधान्याच्या कडब्यातून भागविली जाऊ शकते. चारा टरफलांचा उपयोग पशू आणि कोंबडी खाद्य तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो.’’

अनुप कुमार यांच्या संकल्पनेतून महोत्सव

सहकार सचिव अनुपकुमार यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव सुरू आहे. खरेदीदार आणि विक्रेता यांच्यात समन्वय ठेवत तृणधान्यांशी संबंधित कृषी प्रक्रिया प्रकल्पांना सर्वंकष माहिती देणारे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

उत्तर प्रदेशच्या कंपनीशी ‘महाफेड’चा करार

उत्तर प्रदेश येथील रामपूर कृषक फार्मर प्रोड्युसर कंपनीने पणन महासंघाशी करार केला आहे. महासंघाकडून तृणधान्यांची खरेदी केली जाईल. या तृणधान्यांपासून तयार केलेले उपपदार्थ कुपोषित बालकांच्या आहारात समाविष्ट केले जातील.

प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रदर्शनात नाचणी, बाजरी, भगर, सावा, ज्वारी आदी तृणधान्यांपासून तयार केलेले पदार्थ आणि पिठाची विक्री केली जात आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. काही उत्पादक कंपन्यांनी तयार केलेले पदार्थ पहिल्याच दिवशी संपले. प्रदर्शनात ४० कंपन्यांचे स्टॉल आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT