Mosambi Variety  Agrowon
ताज्या बातम्या

Mosambi Variety : मोसंबीच्या वाणांची संशोधनासाठी साठवणूक

Citrus Crop Research : त्या वाणांची फळे सोबत नेऊन त्या फळांच्या बिया संस्थेत उणे १९६ अंश सेल्सिअस तापमानात साठवणूक करण्यात येणार आहेत.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Jalna News : जिल्ह्यातील बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रातील काही वाणांची निवड नवी दिल्ली येथील राष्ट्रीय वनस्पनी आनुवंशिक संसाधन केंद्राच्या (एनबीपीजीआर) लिंबूवर्गीय प्रकल्पाच्या पथकाने केली आहे.

त्या वाणांची फळे सोबत नेऊन त्या फळांच्या बिया संस्थेत उणे १९६ अंश सेल्सिअस तापमानात साठवणूक करण्यात येणार आहेत. भविष्यात हा साठा शेतकरी, तसेच या पिकावर संशोधन करणाऱ्या संशोधकांना कामी येणार आहे.

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय वनस्पनी आनुवंशिक संसाधन केंद्राच्या पथकाने गुरुवारी (ता. २१) मोसंबी संशोधन केंद्रास भेट दिली. या केंद्राच्या लिंबूवर्गीय प्रकल्प प्रमुख डॉ. सुरेंद्र मलिक यांच्यासह शास्रज्ञ डॉ. ओमप्रकाश धारीवाल, मोसंबी केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील, वरिष्ठ संशोधन सहायक त्रिवेणी सांगळे आदींची उपस्थिती होती.

केंद्राच्या प्रक्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या कटर व्हॅलेंटिया, वॉशिंग्टन नावेल, काटोल गोल्ड, पॅरा ऑरेंज, जाफा, ब्लड रेड, साठगुडी, पमेलो, हमालीन, न्यूसेलर आदी वाणांची अन् अलिमो, रंगपूर, जंबेरी खुंटाची पाहणी व निरीक्षण करण्यात आले.

या वेळी पथकाने केंद्रातील काही वाणांची निवड केली. त्याची फळे सोबत नेऊन संस्थेत उणे १९६ अंश सेल्सिअस तापमानात साठवणूक करण्यात येणार आहे. केंद्राच्या नियोजन व्यवस्थापनाबाबत पथकाने समाधान व्यक्त केले. या वेळी केंद्रातील स्वप्नील बुजुर्गे, ज्ञानोबा रणेर, सुरेश पेरकर, सुरेश गजर आदींची उपस्थिती होती.

बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या विविध मोसंबी, लिंबूवर्गीय वाणांचा संग्रह भविष्यात शेतकरी आणि देश हिताचा असून, तो जतन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे महत्त्वाचे.
- डॉ. सुरेंद्र मलिक, प्रमुख शास्रज्ञ, राष्ट्रीय वनस्पनी आनुवंशिक संसाधन केंद्र, लिंबूवर्गीय प्रकल्प

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT