Kolhapur News  Agrowon
ताज्या बातम्या

Rajshri Shahu Maharaj : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना राज्यभरात मानवंदना

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त शनिवारी (ता.६) त्यांना राज्याच्या विविध भागांत मानवंदना देण्यात आली.

Team Agrowon

Kolhapur News राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त शनिवारी (ता.६) त्यांना राज्याच्या विविध भागांत मानवंदना देण्यात आली. कोल्हापुरात सकाळी दहा वाजता नागरिकांनी १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अनोखी मानवंदना दिली.

कोल्हापूरच्या शाहू स्मृती स्थळ येथे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडीक, धैर्यशील माने यांनी पुष्पहार अर्पण करून शाहू महाराजांना अभिवादन केले. शाहूंप्रेमींनी दिलेल्या ‘श्री शाहू महाराज की जय’ या जयघोषाने समाधी स्थळ परिसर दुमदुमून गेला.

...अन् सर्वजण आहे त्या जागी स्तब्ध

कोल्हापुरात रस्त्यांवरील एस. टी. बसेससह चौकाचौकांतील सिग्नलवरील अन्य वाहने, बैलगाड्यांसह शेतकरी, नागरिक सकाळी दहा वाजता १०० सेकंद आहे त्या जागेवर थांबले.

विविध शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, विक्रेते, बँकांमधील ग्राहक, प्रवासी, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठातील विद्यार्थी, शाहू प्रेमी नागरिकांनी उपक्रमात सहभागी होऊन लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना अनोखी मानवंदना दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Project: इथेनॉल प्रकल्प चालणार कसे?

Maharashtra Grape Growers Association: नवे वाण, मातीचे आरोग्य, नव्या तंत्राचे महत्त्व झाले अधोरेखित

Strawberry Farming: आदिवासींच्या शेतात वाढणार स्ट्रॉबेरीची लाली

El Nino & Global Food Security: ‘एल निनो’ आणि जागतिक अन्नसुरक्षा

Bhimashankar Tourism: सह्याद्रीत बहरले निसर्गाचे वैभव

SCROLL FOR NEXT