Onion Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Onion Cultivation : लोहगाव परिसरात कांदा लागवडीला वेग; क्षेत्र घटले

लोहगाव महसूल मंडळात रंब्बी हंगामातील कांदा लागवडीला वेग आला आहे. गतवर्षी उत्पादित कांदा पिकाला अपेक्षित भाव न मिळाल्याने या वर्षी कांदा लागवडीचे क्षेत्र घटले तर गव्हाचे क्षेत्र वाढले आहे.

Team Agrowon

लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळात रंब्बी हंगामातील (Rabbi Season) कांदा लागवडीला (Onion Cultivation) वेग आला आहे. गतवर्षी उत्पादित कांदा पिकाला अपेक्षित भाव न मिळाल्याने या वर्षी कांदा लागवडीचे क्षेत्र घटले तर गव्हाचे क्षेत्र वाढले आहे.

गतवर्षी लोहगावसह परिसरातील तोडोळी, गाढेगाव, ब्रह्मगव्हाण, मावसगव्हाण, लामगव्हाण, जोगेश्वरी वाडगाव, मुलाणीवाडगाव, शेवता, विजयपूर, तारू पिपंळवाडी ढाकेफळ, ७४ जळगाव, शेत शिवारात रब्बी कांदालागवडीसाठी दूरवरील भागातून रोपे विकत घेऊन मोठ्या प्रमाणात लागवड केली होती.

परतु एकरी आठ ते दहा हजार रुपये मजुरी, निविष्ठा रोपे, औषधी फवारणी, कांदा काढणी साठवणुकीसाठी कांदाचाळ उभारणीचा मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानंतर काही महिने कांदाचाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यास अपेक्षित भाव न मिळाल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले. त्यानंतर खरिपातही कापूस, तूर, मूग, सोयाबीन, पिकाला सततचा व सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने शेतकरी उत्पन्नाअभावी बैचेन झाले असताना थोडेबहुत हातात आलेल्या कापसाचेही दर घसरल्याने अडचणीत सापडलेले शेतकरी रब्बी हंगामात गहू पेरणीकडे वळले आहेत.

त्यामुळे गतवर्षीपेक्षा या वर्षी कांदा लागवड क्षेत्र घटले आहे. कमी क्षेत्रावर लागवडीची लगबग संध्या परिसरात सुरू आहे.
गेल्या हंगामात खूप मोठे क्षेत्र ऊसाचे होते. तोडणी कामगार, वाहतूक यंत्रणेवर कारखाना व्यवस्थापनाचे नियंत्रण न राहिल्याने विविध साखर कारखान्यांकडे नोंद केलेल्या ऊसाची तोड करण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक झाली. अनेक शेतकऱ्यांनी ऊस पीक मोडले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2025: देशात खरीप पेरणीला वेग; कापूस, सोयाबीन, तूर पिछाडीवर

ZP School Admission : झेडपी शाळेत प्रवेश घेतल्यास होणार कर माफ

Free Sand Policy : घरकुल लाभार्थ्यांना चार टक्केच वाळूचा पुरवठा

Crab Farming : बंदीस्त खेकडा पालन करण्यासाठी प्रोत्साहन

Livestock Support: पशुपालकांना आता मिळणार शेतीसारख्या सवलती; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

SCROLL FOR NEXT