Onion Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Onion Cultivation : भेंडे तालुक्यात कांदा लागवडीस वेग

रब्बी हंगामातील गहू- हरभऱ्यासह सर्व पिके जोमदार आलेली आहेत. या पिकांबरोबरच उन्हाळ कांद्याची लागवड अनेक ठिकाणी झालेली असून, काही जण अद्यापही कांदा लागवड करीत आहेत.

Team Agrowon

भेंडे ः रब्बी हंगामातील (Rabi Season) गहू- हरभऱ्यासह सर्व पिके जोमदार आलेली आहेत. या पिकांबरोबरच उन्हाळ कांद्याची लागवड (Summer Onion Cultivation) अनेक ठिकाणी झालेली असून, काही जण अद्यापही कांदा लागवड (Onion Cultivation) करीत आहेत. मात्र, मजुरांची टंचाई (Labor Shortage) निर्माण झाली आहे.

यंदा भेंडे परिसरात कांदा लागवडीने वेग धरला आहे. कांदारोप बऱ्यापैकी उपलब्ध असले, तरी बदलते ढगाळ हवामान, मजुरांची टंचाई, यामुळे उत्पादनखर्च कमालीचा वाढला आहे.

कांदा लागवडीसाठी नांगरट, शेत तयार करणे, वाफे पाडणे, खत विकत घेणे, याशिवाय फक्त लागवडीला एकरी १० ते १२ हजार रुपये मजुरी, कीटकनाशके यांसह मजुरांची ने-आण करण्यासाठी चारचाकी वाहनाचा वाहतूक खर्च करावा लागतो, तो वेगळाच. एकंदरीत, कांदापीक येईपर्यंत एकरी ४० ते ५० हजार रुपयांपुढे खर्च येतो.

या सर्वांचा ताळमेळ बसविणे कांदा उत्पादकांना अडचणीचे ठरत आहे. मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी आशा होती. मात्र, ती फोल ठरली. मागील वर्षी नाही तर यंदा कांद्याला भाव साधेल, या आशेने शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड सुरू केली आहे.

कांदा लागवडीसाठी एकरी १० ते १२ हजार, तसेच मजुरी, मशागत, रोपे, खते, कीटकनाशक फवारणी, पीककाढणी याचा खर्च पाहता, एकरी पन्नास हजार रुपये मोजावे लागतात. मागील वर्षी अपवाद सोडता भावात अपेक्षित वाढ झालीच नाही. यंदा मात्र अपेक्षित भाव मिळावा, हीच अपेक्षा.

- राजेंद्र मिसाळ, शेतकरी, भेंडे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: पश्चिम महाराष्ट्रासह कोकण आणि दक्षिण मराठवाड्यातही पावसाची शक्यता

Farmer Relief Demand: शेतकऱ्यांना तुटपुंज्या मदतीची खैरात नको, हेक्टरी १ लाख रुपये सरसकट मदत द्या, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

Cyclone Damage Insurance : वादळात नुकसानीची भरपाई मिळण्याबाबत संभ्रम

Kharif Crop Damage : खरिपातील पिकांची हानी, रब्बीवर मदार

Women Farmers Certificate : महिला शेतकरी प्रमाणपत्रांत अकोला तालुका आघाडीवर

SCROLL FOR NEXT