Jaljeevan Mission Agrowon
ताज्या बातम्या

Jaljeevan Mission : ‘जलजीवन मिशन’अंतर्गत गुरुवारी विशेष ग्रामसभा

या ग्रामसभेदरम्यान ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत मंजूर योजनेची सविस्तर माहिती, योजनेची उद्दिष्टे, योजनेतील समाविष्ट उपांगे, मंजूर निविदेची रक्कम, योजनेचा कालावधी, कंत्राटदारांचे नाव, नळ जोडणीची सद्यःस्थिती आदींची माहिती द्यावी.

Team Agrowon

बुलडाणा : देशभरात केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून ‘जलजीवन मिशन’ (Jaljeevan Mission) हा एक महत्वांकाक्षी प्रकल्प (Water Project) सुरु करण्यात आलेला आहे.

या अभियानांतर्गत ‘ग्रामीण भागातील (Rural Area) सर्व कुटुंबांना विहित गुणवत्तेसह, पुरेसे व नियमित स्वरूपात पाणी पुरवठा करण्याचे’ उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने ग्रामसभांमध्ये ‘जलजीवन मिशन’ हा विषय प्राधान्याने घेण्याचे आवाहन बुलडाणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले.

या उपक्रमास लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी विविध स्तरावर व्यापक प्रचार, प्रसिध्दी देणे आवश्यक आहे.

त्या अनुषंगाने गुरुवारी (ता.२६) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभेमध्ये ‘जल जीवन मिशन’बाबत माहिती दिली जाईल.

ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत सदस्यांसोबत ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य उपस्थित राहतील.

या ग्रामसभेदरम्यान ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत मंजूर योजनेची सविस्तर माहिती, योजनेची उद्दिष्टे, योजनेतील समाविष्ट उपांगे, मंजूर निविदेची रक्कम, योजनेचा कालावधी, कंत्राटदारांचे नाव, नळ जोडणीची सद्यःस्थिती आदींची माहिती द्यावी.

तसेच चर्चा घडवून आणावी. गावातील पाणीपुरवठा सुविधांच्या अनुषंगाने आवश्यक जमा करावयाचा समुदायाचा वाटा, जमा झालेली रक्कम व उर्वरित जमा करावयाची रक्कम याबाबत आवश्यक कृती योजना आखण्याबाबत चर्चा घडवून आणावी.

योजनेची कामे अंतिम टप्प्यात आहेत, अशी गावे ‘हर घर नल से जल’ म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न करावा.

पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षणांतर्गंत पाणी गुणवत्ता चाचणीसाठी प्रशिक्षित केलेल्या महिलांना सभेस आमंत्रित करून सन्मानित करण्यात येईल. या महिलांची संपर्क क्रमांकासहित नावे गावातील सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे प्रसिद्ध करण्यात येतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन उभारावे

Electricity Departments Action: सिंगल फेज वापरणाऱ्या १९२ जणांवर कारवाई

Wildlife Protection: वाहनांसह बचाव साहित्य वन विभागाकडे सुपूर्द

Kharif Season Planning: खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासन कटिबद्ध : शंभूराज देसाई

HTBT Seeds Illegal Sale: एचटीबीटी कपाशी बियाणे विक्री विरोधात कारवाई करा

SCROLL FOR NEXT