Swachhata Abjiyan  Agrowon
ताज्या बातम्या

Swachh Bharat Abhiyan : सोलापूर जिल्ह्यात विशेष स्वच्छता अभियान

Swachh Bharat Mission : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जिल्ह्यात ओडीएफ प्लस ग्रामपंचायती सर्वाधिक होण्यासाठी येत्या ३१ ऑगस्टपर्यंत विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Solapur News : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जिल्ह्यात ओडीएफ प्लस ग्रामपंचायती सर्वाधिक होण्यासाठी येत्या ३१ ऑगस्टपर्यंत विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानाशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा पुस्तकात त्याची विशेष नोंद घेण्यात येणार आहे. त्यामुळे हे अभियान प्रभावीपणे राबवा, असे आवाहनही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले.

जिल्हास्तरीय बैठकीत या विशेष अभियानाच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी दिल्या. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, प्रकल्प संचालक अमोल जाधव, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिरकले, शिक्षणाधिकारी संजय जावीर उपस्थित होते.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत एक ऑगस्ट ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत विविध उपक्रम राबविण्याबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्य पाणी व स्वच्छता मिशनअंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचे अभियान संचालक यांनी हे यशस्वी करण्यासाठी सूचित केले आहे.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोनअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावे हागणदारीमुक्त अधिक ओडीएफ प्लस गावे म्हणून घोषित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या अनुषंगाने गाव पातळीवर दृश्यमान स्वच्छतेवर चळवळ उभी करणेत येत आहे.

पुढील ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या तीन महिन्यांमध्ये प्रत्येक दिवशी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना आव्हाळे यांनी दिल्या. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी या अभियानाची सविस्तर माहिती दिली.

अभियानात हे उपक्रम राबवणार

या अभियानात पोस्टर स्पर्धा, पेंटिंग्ज स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, कविता स्पर्धा, टाकाऊ वस्तूपासून टाकाऊ वस्तू तयार करणे, कचरा वर्गीकरण, मासिक पाळी व्यवस्थापन, युवा दिन, महिला बचत गट बैठक, सार्वजनिक शौचालय स्वच्छता, कापडी पिशव्यांचा वापर, स्वच्छता रॅली, उत्कृष्ट छायाचित्र स्पर्धा, प्लॅस्टिक वस्तूंचा वापर घटविणे साठी दुकानदार यांच्याशी संवाद, सार्वजनिक जलस्रोत स्वच्छता मोहीम, शालेय पथनाट्य, व्हिडिओ शो, गावातील पारंपरिक अस्वच्छ जागेची स्वच्छता, ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत आदी विशेष उपक्रम घेण्यात येणार आहेत. असे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT