Soybean  Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Crop Damage : पावसाचे पुनरागमन सोयाबीनसाठी मारक

पावसाने पुन्हा जिल्ह्यात अनेक ठिकाणी हजेरी लावल्याने सोयाबीन काढणीसाठी हा पाऊस मारक ठरण्याची चिन्हे आहेत.

टीम ॲग्रोवन

अकोला ः पावसाने पुन्हा जिल्ह्यात अनेक ठिकाणी हजेरी लावल्याने सोयाबीन काढणीसाठी (Soybean Harvesting) हा पाऊस मारक ठरण्याची चिन्हे आहेत. काही गावशिवारात तर रात्रभर रिमझिम पाऊस (Rainfall) झाला. त्यामुळे सोयाबीन सोंगणी, मळणीला अडचण तयार झाली.

सोयाबीनचे पीक सर्वत्र काढणीसाठी तयार होत आहे. लवकर निघणाऱ्या जातींच्या सोयाबीनची काढणी आठवडाभरापासून जोमाने सुरू झाली. यंदा सोयाबीनची मजुरांद्वारे केली जाणारी सोंगणी महागली आहे. कुठे २८०० रुपये, तर कुठे साडेतीन हजार रुपयांपर्यंत एकरी दर चुकवावा लागत आहे.

तर जेथे सोयाबीनची काढणी झाली त्या भागात अनेकांना तीन ते आठ क्विंटलदरम्यान उतारा लागत असल्याचे आकडे समोर आले. यावरून सोयाबीनची उत्पादकता आधीच कमी झाल्याचे स्पष्ट आहे. हातातोंडाशी आलेला खास पावसामुळे यंदाही हिरावतो की काय अशी शंका निर्माण होत आहे.

सोयाबीन काढणीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना पाऊस नको आहे. सोयाबीनच्या झाडांवर ५० टक्के शेंगा वाळलेल्या आहेत. विविध हवामान तज्ज्ञांकडून आणखी तीन ते चार दिवस पाऊस होऊ शकतो, अशा पोस्ट समाज माध्यमातून फिरवल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे.

ऐन दसऱ्याच्या दिवशी आलेल्या पावसाने सोयाबीनची सोंगणी करून ठेवलेल्यांच्या मनात धडकी भरवली. रात्रभर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने गुरुवारी शेतांमधील सर्वच कामे ठप्प पडली. दिवसभर ढगाळ वातावरणही तयार झालेले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT