अॅग्रोवन वृत्तसेवा
हिंगोली ः कृषी उत्पन्न बाजार (Agricultural Produce Market ) समितीअंतर्गत धान्य बाजार (Soybean Bazar) (भुसार मार्केट)मध्ये शनिवारी (ता. ३१) सोयाबीनची ५०५ क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४८५५ ते कमाल ५४७६ रुपये तर सरासरी ५१६५ रुपये दर मिळाले.
हिंगोली धान्य बाजारात सोमवार (ता. २६) ते शनिवार (ता. ३१) या कालावधीत सोयाबीनची एकूण ५९९१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५४७६ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. ३०)सोयाबीनची ५५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८४५ ते कमाल ५४०५ रुपये तर सरासरी ५१२५ रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २९) सोयाबीनची ११०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५३६० रुपये तर सरासरी ५०८० रुपये दर मिळाले.
बुधवारी (ता. २८) सोयाबीनची ८०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४८८० ते कमाल ५३८० रुपये तर सरासरी ५१३० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २७) सोयाबीनची १४८१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४९०० ते कमाल ५४०२ रुपये तर सरासरी ५१५१ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. २६) सोयाबीनची १५५५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४९०० ते कमाल ५४२९ रुपये तर सरासरी ५१६४ रुपये दर मिळाले. मागील आठवड्यात हिंगोली धान्य बाजारातील सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे दैनंदिन आवक देखील कमी झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.