soybean market
soybean market agrowon
ताज्या बातम्या

Soybean Market : विदर्भात बाजार समितीमध्ये सोयाबीन आवक घटली

Team Agrowon

अमरावती : सोयाबीन दर (Soybean Rate) वाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून असल्यामुळे विदर्भातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मंदावली आहे. अमरावती बाजार समितीत (Soybean Market) डिसेंबर महिन्यात सरासरी दहा हजार क्विंटलची आवक राहते. आजच्या घडीला मात्र अवघी तीन ते चार क्विंटलची आवक होत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव विजय दीपककर यांनी दिली.

सोयाबीनला आठ ते दहा हजार रुपये क्विंटलचा दर गेल्या हंगामात मिळाला होता. त्यामुळे यंदाच्या हंगामातदेखील सोयाबीनचे दर तेजीत राहतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. संततधार पाऊस, अतिवृष्टीचा फटका बसत विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात सोयाबीनची उत्पादकता प्रभावीत झाली. कृषी खात्याच्या पीक कापणी प्रयोगाअंती देखील हे वास्तव समोर आले असले तरीसुद्धा सध्या सोयाबीनचा बाजार अपेक्षित तेजीत नाही. परिणामी यापुढील काळात दर वाढतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांकडून सोयाबीनची गरजेपुरती विक्री होत आहे.

आर्थिक गरज भागविण्यासाठी आवश्यक असलेला पैसा उपलब्ध झाला तेवढ्यापुरत्याच सोयाबीन बाजारात आणले जात आहे. त्यामुळे अकोला, अमरावती, कारंजा, यवतमाळ या बाजारपेठांमध्ये सोयाबीनची आवक गेल्या हंगामातील आवकेच्या तुलनेत कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अकोला बाजार समितीचे सचिव सुनील मालोकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या हंगामात सोयाबीनला आठ ते दहा हजार रुपये क्विंटरचा दर मिळाला होता. यावर्षीच्या हंगामात देखील सुरुवातीला दर सहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर मात्र सोयाबीनचे दर ५३०० ते ५४०० रुपयांवर स्थिरावले आहेत. बहुतांश शेतकरी सोयाबीन विकण्याऐवजी तारण ठेवण्यावर भर देत आहेत.

अकोला बाजार समितीत ११ हजार ८९४ क्विंटल शेतमाल धारण ठेवण्यात आला आहे. अमरावती बाजार समितीत ५२०० टन सोयाबीन तारण ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे अनेक योजनांमधून शेतकऱ्यांनी गाव पातळीवर गोदामाची उभारणी केली आहे. या गोदामाचा देखील शेतमाल साठवणुकीसाठी प्रभावीपणे उपयोग केला जात आहे. त्याचा देखील बाजारातील सोयाबीन आवकेवर परिणाम झाल्याचे अमरावती बाजार समितीचे सचिव विजय दीपककर यांनी सांगितले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नऊ ते दहा हजार क्विंटल सोयाबीनची आवक अमरावती बाजार समितीत होत होती यंदाच्या अंगामात मात्र ही आवक अवघ्या तीन हजार क्विंटलपर्यंत आली आहे. बाजारात तेजी आल्यास ही आवक वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोयाबीनमध्ये तेजीची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांकडून सध्या शेतमाल गरजेपुरता विकत साठवणुकीवर भर दिला जात आहे. त्यामुळे बाजारातील आवक कमी झाली आहे. गेल्या हंगामात दहा हजार क्विंटल असताना यंदा मात्र ती तीन हजारांवर आली आहे. खेडा खरेदीचा परिणाम देखील सोयाबीन आवकवर झाला आहे.

- विजय दीपककर, सचिव, बाजार समिती, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT