E Peek Pahani
E Peek Pahani Agrowon
ताज्या बातम्या

E Peek Pahani: नांदेड जिल्ह्यात तीन लाख हेक्टरसाठी नोंदविला पेरा

टीम अॅग्रोवन.

नांदेड : राज्यात ई-पीक (E-Crop Survey) पाहणी मोहिमेअंतर्गत शेतकरी स्तरावरील खरिपातील पिकांचा पेरा (Crop Sowing) नोंदणी करण्याची मुदत नुकतीच संपली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख ३८ हजार ८०६ शेतकऱ्यांनी तीन लाख ९३ हजार १९६ हेक्टरसाठी पीक पेरा नोंदणी केली आहे.

राज्यात मागीलवर्षी खरीप हंगामापासून महसूल विभाग आणि कृषी विभागाच्यावतीन ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. माझी शेती, माझा सातबारा, माझा पीक पेरा या घोषवाक्याचा आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याची सुरवात १५ ऑगस्ट २०२२ रोजी झाली होती. यात मोबाईल अपद्वारे शेतकरी खातेदारांनी पेरा नोंदणी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते.

राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी ई-पीक पाहणी मोबाईल अपव्दारे शेतकरी स्तरावरील पिक पाहणीची कालमर्यादा ता. १५ ऑक्टोबरवरुन २२ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली होती. नांदेड जिल्ह्यात या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख ३८ हजार ८०६ शेतकऱ्यांनी तीन लाख ९३ हजार १९६ हेक्टरसाठी पेरा नोंदणी केली आहे. जिल्ह्यात कायम पड क्षेत्र नऊ हजार ४८१ हेक्टर तर चालू पड क्षेत्र चार हजार ७७ हेक्टर आहे. एकूण क्षेत्र चार लाख सहा ७५५ हेक्टर असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्राने दिली.

तालुका खातेदार संख्या पेरा नोंदणी क्षेत्र

अर्धापूर १३,७२४ १४,२२८

उमरी १२,२१६ १३,५८६

किनवट २२,४४७ ३२,४४८

कंधार ३७,७६८ ४०,१२३

देगलूर २५,९८२ ३२,००९

धर्माबाद १३,५०५ १६,३२९

नायगाव २८,३२२ २९,२२१

नांदेड १२,०४१ १२,१२९

बिलोली २६,२८१ २९,२२९

भोकर १६,२७९ २०,५५७

माहूर ७,९०८ १०,४४४

मुखेड ३५,६०२ ४१,५१९

मुदखेड १३,१२३ १४,०२९

लोहा ३६,१५० ४०,५०४

हदगाव २५,५०२ ३१,४८४

हिमायतनगर ११,८५९ १५,२४०

एकूण ३,३८,८०६ ३,९३,१९६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT