Kharip Sowing
Kharip Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : राज्यात यंदा आतापर्यंत पावणेसात लाख हेक्टरवर पेरणी

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

नगर ः रब्बी ज्वारीच्या पेरणीचा (Rabi Jowar Sowing) कालावधी संपल्यात जमा आहे. आतापर्यंत राज्यात ६ लाख ६८ हजार हेक्टरवर पेरणी (Sowing) झाली आहे. यंदा परतीच्या पावसाने वाफसा न झाल्यामुळे पेरणीला उशीर झाला. मात्र राज्यात ज्वारीचे (Jowar Sowing Acreage) सरासरी क्षेत्र पाहता आतापर्यंत केवळ ३८.४४ टक्के पेरणी झाली आहे. त्यामुळे यंदाही ज्वारीच्या क्षेत्रात कमालीची घट होण्याचा अंदाज दिसत आहे. आतापर्यंत सर्वाधिक ज्वारी सोलापुरात पेरली आहे.

राज्यात ज्वारीचे सरासरी १७ लाख ३६ हजार २८६ हेक्टर क्षेत्र आहे. मुळात राज्यात रब्बीत ज्वारी हे प्रमुख पीक गणले जात होते. मात्र अलीकडच्या पाच वर्षांत ज्वारीचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. क्षेत्र घटत असल्याने सरासरी क्षेत्रातही कमी केले जात आहे. २००० मध्ये रब्बीत ज्वारीची ३१ लाख ८४ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या वर्षी केवळ १२ लाख ४४ हजार हेक्टरवर पेरणी झाली.

यंदा परतीचा पावसाचा रब्बी हंगामावर मोठा गंभीर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते यंदा वीस दिवस ते महिनाभर रब्बीच्या पेरण्या उशिराने सुरू झाल्या. ज्वारीचे क्षेत्र असलेल्या नगर, सोलापूर, मराठवाड्यातील काही भागांत ऑगस्टपासून (गोकुळ अष्टमी) ज्वारी पेरायला सुरू होते.

ऑक्टोबर अखेरपर्यंत ज्वारी पेरून होते. त्यामुळे ज्वारी पेरणीचा कालावधी आता संपल्यात जमा आहे. मात्र आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३८ टक्के पेरणी झाली. आतापर्यंत सर्वाधिक पेरणी सोलापूर, नगर, सातारा, बीड जिल्ह्यांत सर्वाधिक पेरणी झाली आहे. आतापर्यंतचा पेरणीचा वेग पाहता यंदा गतवर्षीपेक्षा क्षेत्रात घट होण्याचा अंदाज दिसत आहे.

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा जिल्ह्यांत ज्वारीचे पीक घेतले जात नसल्याने या जिल्ह्यांत अजिबात ज्वारी पेरली गेली नाही. तर नागपूर, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्‍ह्यांत ज्वारीचे बोटावर मोजण्याएवढे क्षेत्र असते, मात्र अजून तेथे अल्प पेरणी झाली.

दर नसल्याचाही परिणाम

बाजारात ज्वारीला मागणी बऱ्यापैकी आहे. मात्र भुसार माला गणल्या जाणाऱ्या ज्वारीला बाजारात पुरेसा दर मिळत नाही. नगर येथील बाजार समितीत ज्वारीची सर्वाधिक आवक होत असते. मात्र आतापर्यंतचा दर पाहता तीन हजारांपेक्षा अधिक दर मिळाला नाही. सरासरी दर दोन हजारांच्या जवळच असते. खते, बियाणे, मजुरीचे वाढत दर पाहत ज्वारीचे पीक परवडत नसल्याने ज्वारीकडील शेतकऱ्यांचा कल कमी होत असल्याचे दिसत आहे.

आतापर्यंत ज्वारीची पेरणी (हेक्टरमध्ये)

नाशिक ः ३७७, धुळे ः १५११, नंदुरबार ः ९९९, जळगाव ः १३३०१, नगर ः ९६३८६, पुणे ः ४६३४७, सोलापूर ः १,३०,९८०, सातारा ः ७११४१, सांगली ः १०१८०८, कोल्हापूर ः ४९४, औरंगाबाद ः ६२०७, जालना ः ३५४०२, बीड ः ८३७३०, लातूर ः ५७४९, उस्मानाबाद ः ३१४४०, नांदेड ः ६०७७, परभणी ः ३२५०८, हिंगोली ः २५३१, बुलडाणा ः २०, अकोला ः २, अमरावती ः ०, यवतमाळ ः ४, वर्धा ः २४५, नागपूर ः ०, भंडारा ः ०, गोंदिया ः २, चंद्रपूर ः ५५, गडचिरोली ः २०. (१४ नोव्हेंबरपर्यंतचा अहवाल, स्रोत ः कृषी विभाग)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

SCROLL FOR NEXT