Rabbi sowing
Rabbi sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Season : रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्यांना गती येणार

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली : जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामातील (Rabbi Sowing) पेरण्या रखडल्या होत्या. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीत दिल्यामुळे शेतकरी रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीचे (Crop Sowing) नियोजन करत आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८७ हजार २१८ हेक्टरवर पेरा झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या (Agriculture Department) सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील जत तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारीची आगाप पेरणी केली जाते. गत आठवड्यात जत तालुक्यात ४९ हजार १४ हेक्टरवर पेरा झाला होता. त्यामुळे जत तालुक्यात सर्वाधिक ज्वारीची पेरणी झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील विविध भागांत शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीसाठी मशागती पूर्ण केल्या. जिह्यात ज्वारी, गहू, मका, हरभरा, सूर्यफुल या पिकांची पेरणी झाली आहे. बियाणे खरेदी करून पिकाच्या पेरणीची तयारी शेतकरी करू लागला होता.
जिल्ह्यात १ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत परतीच्या पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेतात पाणी साचले होते. परिणामी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी रखडली होती. 

वाफसा नसल्याने
शेतकऱ्यांना पेरणी करता येत नसल्याचे चित्र होते. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली. वाफसा येऊ लागल्याने पेरणीसाठी शेतकरी नियोजन करू लागला आहे. पावसाने उघडीप दिल्याने पेरणीला गती येणार आहे.

रब्बी हंगामातील तालुकानिहाय पेरणी (क्षेत्र हेक्टरमध्ये)
मिरज ६५१७
जत ५४४६१
खानापूर १२०
वाळवा २६
तासगाव ८०९
शिराळा ११०
आटपाडी १३२४२
कवठे महांकाळ १०३८९
पलूस ११०
कडेगाव १५१५
एकूण ८७२११
पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
ज्वारी ७७ हजार ९७५
मका ७ हजार ६७९
हरभरा १३५५
गहू १७१
सूर्यफुल २९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT