Kharif Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : नांदेड जिल्ह्यात ज्वारी, उडीद, मुगाचा पेरा घटला

Kharif Season 2023 : जिल्ह्यात खरीप हंगामात सात लाख ६६ हजार ८०९ हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र आहे. यंदा मृग नक्षत्र कोरडे गेल्याने खरिपातील पेरण्यांना उशीर झाला.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात जुलैमधील पावसामुळे खरिपातील पेरण्यांची वेग घेतला. मंगळवारपर्यंत (ता. २६) जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९२ टक्क्यांनुसार सात लाख सहा हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या.

यात सर्वाधिक चार लाख हेक्टरवर सोयाबीन, तर एक लाख ९४ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. परंतु पाऊस लांबल्याने यंदा ज्वारी, उडीद, मुगाचा पेरा घटल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

जिल्ह्यात खरीप हंगामात सात लाख ६६ हजार ८०९ हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र आहे. यंदा मृग नक्षत्र कोरडे गेल्याने खरिपातील पेरण्यांना उशीर झाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरिपातील पेरण्यांना प्रांरभ झाला. परंतु हा पाऊस सर्वदूर नसल्याने ठरावीक भागातच पाऊस झाला होता. यानंतर मात्र पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने सर्वत्र पेरण्यांना सुरुवात झाली.

पाऊस लांबल्याने यंदा मात्र उडीद तसेच मुगाचा पेरा घटला आहे. बुधवारपर्यंत (ता. २६) जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९२ टक्क्यांनुसार सात लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या. यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ११६ टक्क्यांनुसार चार लाख हेक्टरवर सोयाबीन तर तर सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ८० टक्क्यांनुसार एक लाख ९४ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे.

सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९२ टक्क्यांनुसार ६२ हजार हेक्टरवर तूर, सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ४८.२० टक्क्यांनुसार १३ हजार हेक्टरवर मूग, सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ४२.५३ टक्क्यांनुसार १२ हजार हेक्टरवर उडीद, सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या २१.१३ टक्क्यांनुसार साडेनऊ हजार हेक्टरवर खरीप ज्वारीची लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari River Basin : गोदावरी खोरे मोठे, मात्र तुटीचे खोरे

Agriculture Irrigation Scheme: शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार ४ लाखांपर्यंत अनुदान; सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना

Post-Harvest Packaging : किरकोळ ग्राहकांपर्यंत शेतीमाल पोहोचविण्यासाठी पॅकेजिंग

Orchard Farming : नवीन फळझाडांची रोपे, कलमांची निवड

Herbal Processing Business : कोकणात सुगंधी, वनौषधींपासून तेल, पावडर निर्मिती

SCROLL FOR NEXT