Galmukat Dharan Agrowon
ताज्या बातम्या

Galmukt Dharan Yojana : ‘गाळमुक्त धरण’मध्ये सोलापूर जिल्हा राज्यात पहिला

Agriculture Scheme : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेतून जिल्ह्यात ६१ कामांमधून ११.५० लाख घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे.

Team Agrowon

Solapur News : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेतून जिल्ह्यात ६१ कामांमधून ११.५० लाख घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. सुमारे १५०० एकर क्षेत्रामध्ये हा गाळ पसरण्यात आला आहे.

शिवाय तलावातील गाळ काढल्यामुळे नव्याने ११५ कोटी लिटर इतका अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याने या कामात पहिले स्थान पटकावले आहे.

‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यातील अकरा तालुक्यांत १०९ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यातील ६१ कामे पूर्ण झाली आहेत.

तर उर्वरित कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. या योजनेमध्ये २५ अशासकीय संस्था सहभागी झाल्या आहेत. अंदाजे १५०० शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. परवानगी दिलेल्या ६१ कामांमधून ११.५० लाख घन मीटर इतका गाळ काढला आहे. जिल्ह्याने गाळ काढणे, तो पसरणे यात पहिले स्थान पटकावले.

‘जलयुक्त शिवार’लाही गती

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नुकतीच ‘जलयुक्त शिवार’ अभियानाची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी यासंबंधीच्या कामांना गती देण्याची सूचना केली. ‘जलयुक्त शिवार’मध्ये प्राथमिक आराखड्यानुसार ९३ कोटी ९२ लाखांची २ हजार ८९६ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यातील एक हजार ९४० कामांना मंजुरी देऊन, त्यातून ८६५ कामे सुरू झाली. सुरू झालेल्या या कामातून ५७७ कामे पूर्ण झाली आहेत, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT