Sludge Agrowon
ताज्या बातम्या

अमृत सरोवर अभियानातून पाझर तलाव होणार गाळमुक्त

जिल्ह्यात मृद व जलसंधारण व जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने या कामाचे नियोजन केले जाणार असून या कामांवर २४ कोटी रुपये खर्च होणार आहेत.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

नगरः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त नगर जिल्ह्यात २४ एप्रिल ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये अमृत सरोवर अभियान राबवले जाणार आहे. या अभियानातून जिल्ह्यात ७९ पाझर तलाव गाळमुक्त होणार आहे.

जिल्ह्यात मृद व जलसंधारण व जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने या कामाचे नियोजन केले जाणार असून या कामांवर २४ कोटी रुपये खर्च होणार आहेत. पारनेर तालुक्यातील हंगा येथील पिंपळओढा पाझर तलाव दुरुस्तीच्या कामाचा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते शुभारंभ झाला आहे.

शासनाने गेल्या काही वर्षापासून जलसंधारणाची कामे करण्याला प्राधान्य दिले आहे. जलसंधारणाच्या कामामुळे झालेले चांगले परिणाम यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्याने अनुभवले आहेत. अजूनही अनेक वर्षापासूनचे जुने गाव तलाव, पाझर तलाव व अन्य स्रोत गाळाने भरलेले आहेत. गाळ साचल्याने मुळ पाणीसाठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे गाळ काढण्याच्या कामे, नदी-ओढे खोलीकरणही केले जात आहे.

यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त नगर जिल्ह्यात २४ एप्रिल ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये अमृत सरोवर अभियान राबवले जाणार आहे. या अभियानातून मृद व जलसंधारण विभागातून ४० व जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाकडून ३९ पाझर तलाव गाळमुक्त करण्याचे नियोजन केले आहे. या अभियानावर गाळ काढण्यासाठी सुमारे २४ कोटी रुपये खर्च होणार आहे. १५ ऑगस्टपर्यंत म्हणजे साधारण दीड महिन्यात नियोजनातील किमान पंधरा कामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. गाव तलावांतील गाळ काढल्यावर शेतीला मात्र याचा निश्चित फायदा होणार आहे.

तालुकानिहाय कामे

अकोलेः १२, जामखेडः ९, कर्जतः ४, कोपरगावः १, नगरः ६, नेवासाः ४, पारनेरः ९, पाथर्डीः २, राहाताः २, राहुरीः १, संगमनेरः ११, शेवगावः ४, श्रीगोंदाः ३, श्रीरामपूरः १

कामाबाबत केली विचारणा

अमृत सरोवर अभियानातून होत असलेल्या कामांसह अन्य कामाबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी शेतकरी व ग्रामस्थ यांच्याबरोबर संवाद साधला व कामाची आवश्यकता, गुणवत्ता व काम पूर्ण झाल्यानंतर होणाऱ्या पुनर्स्थापित पाणीसाठ्याबाबत विचारणा केली. ग्रामस्थ व लाभार्थी शेतकरी यांनी याबाबत समाधान व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Antyodaya Scheme: अहिल्यानगरमधील २७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ

Drought Relief: दुष्काळग्रस्त शेतकरी, मजुरांना तातडीने मदत द्या : बाळासाहेब थोरात

Orange Damage: मृगबहार संत्राफळांचे नुकसान

Soybean Prices: हमीदरापेक्षा भाव वाढले, उत्पादन मात्र घटले

Leopard Attack: बिबट्याचा धुमाकूळ, पंढरपुरात १३ कोकरे, करमाळ्यात ५ मेंढ्या फस्त

SCROLL FOR NEXT