Goat Rearing  Agrowon
ताज्या बातम्या

Goat Rearing : मरतुकीवर नियंत्रणासाठी शेळीमित्र संकल्पना

Goat Farming : भटकंतीवरील मेंढपाळांच्या शेळ्या-मेंढ्या आजारी पडल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार होत नाहीत. परिणामी, देशात व महाराष्ट्रातही आजारपणामुळे दगावणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांचे प्रमाण ४० ते ४५ टक्‍के आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : ‘‘भटकंतीवरील मेंढपाळांच्या शेळ्या-मेंढ्या आजारी पडल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार होत नाहीत. परिणामी, देशात व महाराष्ट्रातही आजारपणामुळे दगावणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांचे प्रमाण ४० ते ४५ टक्‍के आहे.

त्यामुळे आता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास मंडळाकडून शेळीमित्र ही संकल्पना राज्यभरात राबविण्यात येईल. यातून शेळ्या-मेंढ्यांवर प्राथमिक उपचार करणे शक्‍य होईल,’’ अशी माहिती विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे यांनी दिली.

कांबळे म्हणाले, ‘‘मेंढपाळ शेळ्या-मेंढ्यांच्या चराईसाठी गावोगावी भटकंती करतात. परिणामी मेंढ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आजारपण बळावते. वेळीच उपचार न मिळाल्याने शेळ्या-मेंढ्या दगावतात. ही बाब लक्षात घेता मंडळाने पहिल्या टप्प्यात सहा विभागस्तरावर मोबाईल रुग्णवाहिकांची सुविधा पुरविली आहे.

नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सांगली, अमरावती, चाळीसगाव अशा सहा ठिकाणी या रुग्णवाहिका आहेत. त्यांच्या माध्यमातून शेळी-मेंढ्यांवर वेळीच उपचार करणे शक्‍य होते. येत्या काळात प्रत्येक जिल्हास्तरावर गल्लीबोळात जाऊ शकतील, अशा लहान रुग्णवाहिका देण्याचे प्रस्तावित आहे.’’

‘‘सध्या १०० कृत्रिम रेतन होतात. एक हजार ‘शेळी सखी’चे केडर त्यासाठी तयार केले आहे. महिला आर्थिक मंडळ, ग्रामीण जीवन्नोती अभियानातील महिलांचा यात सहभाग घेतला आहे. याच धर्तीवर आता ‘शेळी मित्र’ संकल्पना राबविण्यात येईल,’’ असेही कांबळे म्हणाले.

‘उपचारांसाठी गावोगावी असणार ‘शेळी मित्र’’

‘‘शेळ्या-मेंढ्यातील मरतुक नियंत्रणासाठी मेंढपाळ अधिक असलेल्या किंवा ते भटकंतीवर जात असलेल्या गावांमध्ये ‘शेळी मित्र’ नावाचे केडर तयार करण्यात येईल. या केडरला सर्व प्रकारचे प्राथमिक उपचार करण्याचे प्रशिक्षण तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या माध्यमातून दिले जाईल.

हे शेळी मित्र रक्‍त नमुने घेतील. लसीकरण करतील. जंतुनाशक औषध देतील. कृत्रिम रेतन गर्भधारणाही ते करतील. ‘शिका आणि कमवा’नुसार त्यांना पशुपालकांकडूनच मोबदला मिळेल,’’ असे कांबळे यांनी सांगितले.

वेळीच उपचाराअभावी शेळ्या-मेंढ्या दगावण्याचे प्रमाण ४० टक्क्यांवर राहते, असा अभ्यास आहे. त्यावर नियंत्रणासाठी पहिल्या टप्प्यात ‘शेळी सखी’ ही संकल्पना राबविली. त्यानंतर आता ‘शेळी मित्र’ या संकल्पनेवर काम सुरू आहे.
- डॉ. शशांक कांबळे, व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास मंडळ, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT