Goat Rearing : उन्हाळ्यात शेळ्यांची कशी काळजी घ्यावी?

Team Agrowon

शेळ्यांना झाडपाल्याची जास्त गरज असते. त्यासाठी शेळ्यांना दररोज पाच किलो हिरवा चारा, एक किलो वाळलेल्या चारा द्यावा.  

Goat Rearing | Agrowon

अाहारामध्ये क्षार मिश्रणाचा वापर केल्यास कमतरतेचे आजार कमी होऊन मांस उत्पादन वाढते. प्रतिजैविकाचा वापर केल्यास शेळीची रोगप्रतिकारक क्षमता वाढते व आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.

Goat Rearing | Agrowon

उन्हाळ्यात ११ ते ४ या काळात भरपूर ऊन असते. उन्हामुळे शेळ्यांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे शेळ्यांना सकाळी लवकर म्हणजे ६ ते ९ या वेळेस किंवा संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत चरण्यासाठी सोडावे.  

Goat Rearing | Agrowon

 चरण्यासाठी विनाकारण जास्त अंतर शेळ्यांना चालवू नये. शक्‍यतो उन्हाळ्यात गोठ्यातच चारा खाऊ घालावा.

Goat Rearing | Agrowon

 उन्हाळ्यात चाऱ्यासाठी दूरवर भटकंतीमुळे गरजेप्रमाणे पोषणतत्त्वे न मिळाल्यामुळे शेळ्यांची प्रकृती खालावते.

Goat Rearing | Agrowon

उन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या लेंड्यांपासून अमोनिया जास्त प्रमाणात बाहेर पडतो. त्यामुळे गोठ्यातील हवा खेळती राहणे आवश्‍यक आहे.

Goat Rearing | Agrowon
Mango production | Agrowon
आणखी पाहा...